शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

महिन्यात शहर प्लाास्टिकमुक्त, सेवाभावी संस्थांच्या बैठकीत निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2020 16:57 IST

पर्यावरणाचे रक्षण करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. त्या दृष्टीने यापूर्वीपासूनच पावले टाकण्यात आली आहेत, प्लास्टिकविरोधी जागृती होत आहे. येत्या २२ फेब्रुवारीला जनजागृतीपर पदयात्रा काढण्याचा तसेच महिन्यात शहर प्लास्टिकमुक्त करण्याचा निर्धार बैठकीत करण्यात आला.

ठळक मुद्देमहिन्यात शहर प्लाास्टिकमुक्त, सेवाभावी संस्थांच्या बैठकीत निर्धार शनिवारी जनजागृतीसाठी पदयात्रा; महापालिकेत झाली बैठक

कोेल्हापूर : पर्यावरणाचे रक्षण करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. त्या दृष्टीने यापूर्वीपासूनच पावले टाकण्यात आली आहेत, प्लास्टिकविरोधी जागृती होत आहे. येत्या २२ फेब्रुवारीला जनजागृतीपर पदयात्रा काढण्याचा तसेच महिन्यात शहर प्लास्टिकमुक्त करण्याचा निर्धार बैठकीत करण्यात आला.शहर प्लास्टिकमुक्तीसाठी सर्व असोसिएशन व सेवाभावी संस्थांची संयुक्त बैठक बुधवारी महापालिकेच्या राजर्षी छत्रपती शाहू सभागृहात झाली. अध्यक्षस्थानी महापौर निलोफर आजरेकर होत्या. आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी प्रमुख उपस्थित होते.आयुक्त डॉ. कलशेट्टी यांनी प्लास्टिकबंदी कृती आराखडा जनजागृतीची माहिती दिली. महास्वच्छता मोहिमेप्रमाणे प्लास्टिक बंदीबाबत लोकचळवळ उभी करूया. महिन्याभरात शहरात प्लास्टिकबंदी करू शकतो. पर्यावरण रक्षणासाठी शनिवारी (दि. २२ फेब्रुवारी)ला शहरामध्ये जनजागृतीपर पदयात्रा काढू. आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील यांनी चित्रफितीद्वारे प्लास्टिकबंदीबाबत सादरीकरण केले. यावेळी प्रदीपभाई कापडिया, अवनि संस्थेच्या अनुराधा भोसले, अशोक पोवार, डॉ. भोपाळ गावडे, अमित देशपांडे, महंमद शरीफ शेख, अजय कोराणे, रमेश मोरे यांनी आपल्या सूचना मांडल्या.

यावेळी खाटीक समाजाचे शिवाजी घोटणे, फिश मार्केटचे शौकीन घोटणे, सहारा फौंडेशनचे राज कोरगांवकर, स्वच्छतादूत अमित देशपांडे, फूलव्यापारी विश्वास जगदाळे, एकटी संस्थेच्या सदस्या सविता कांबळे, रोटरी क्लबचे डॉ. आनंद गुरव, हॉटेल असोसिएशनचे अभय बागलकर, जनरल मटण मार्केटचे प्रकाश प्रभावळकर, नार्वेकर भाजी मार्केटच्या अध्यक्ष गुणवंता पाटील, ऋणमुक्तेश्वर भाजी मंडईचे अध्यक्ष राजेंद्र लयकर, स्वरा फौंडेशनचे अध्यक्ष प्रमोद माजगांवकर, महिलाध्यक्ष सविता पाडळकर, हॉटेल मालक संघाचे सिद्धार्थ लाटकर, अरुण चोपदार, आदी उपस्थित होते. 

 

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीMuncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर