शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

मागासवर्गीय-दिव्यांगांचा अनुशेष पंधरा दिवसांत निश्चित करा-दौलत देसाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 15:05 IST

शासकीय आस्थापनांच्या विभागप्रमुखांनी जिल्हास्तरावरील मागासवर्गीय तसेच दिव्यांगांचा अनुशेष निश्चित करून पंधरा दिवसांत अहवाल सादर करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी येथे दिल्या.

ठळक मुद्दे मागासवर्गीय-दिव्यांगांचा अनुशेष पंधरा दिवसांत निश्चित करा-दौलत देसाई प्रश्नांवर आधारित बैठकीत आदेश

कोल्हापूर : शासकीय आस्थापनांच्या विभागप्रमुखांनी जिल्हास्तरावरील मागासवर्गीय तसेच दिव्यांगांचा अनुशेष निश्चित करून पंधरा दिवसांत अहवाल सादर करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी येथे दिल्या.जिल्हाधिकारी कार्यालयातील राजर्षी छत्रपती शाहू सभागृहात जिल्ह्यातील मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अजय माने, उत्पादन शुल्क अधीक्षक गणेश पाटील, प्रांताधिकारी वैभव नावडकर, शिवाजी विद्यापीठाचे प्र. कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे राज्य महासचिव नामदेवराव कांबळे उपस्थित होते.नामदेव कांबळे यांनी विषय पत्रिकेतील विषयाच्या अनुषंगाने माहिती दिली. यामध्ये प्रामुख्याने विभागप्रमुखांनी ‘१५ ड’ हा अर्ज भरणे आवश्यक असल्याचे सांगितले. मागासवर्गीय पोलीसपाटील यांचा अनुशेष भरणे, अनुकंपा तत्त्वाखालील नियुक्ती देणे, सर्व संवर्गाची बिंदू नामावली अद्ययावत करणे, डिसेंबर २०१९ अखेरचा मागासवर्गीयांच्या पदोन्नतीमध्ये तसेच सरळसेवेमधील भरतीचा अनुशेष भरणे, आदींचा समावेश होता.याबाबतची वस्तुस्थिती जाणून घेतल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व विभागप्रमुखांनी विभागनिहाय जिल्हास्तरावरील माहिती तयार करावी, ज्या विभागांना भरती प्रक्रियेचे अधिकार नाहीत, अशा जिल्हास्तरीय विभागप्रमुखांनी ही माहिती वरिष्ठ कार्यालयाकडून घेऊन तयार ठेवावी, असे सांगितले. निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांनी जिल्ह्यातील अनुकंपा सामाईक सूचिबाबत सविस्तर माहिती दिली.

 

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर