शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
3
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
4
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
5
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
6
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
7
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
8
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
9
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
10
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
11
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
12
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
13
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
14
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
15
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
16
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
17
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
18
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
19
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
20
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित

जिल्ह्यातील तपास यंत्रणा सुस्तावली

By admin | Updated: April 30, 2015 00:23 IST

वरिष्ठांचे दुर्लक्ष : गुन्हेगारीत वाढ, तपास अपूर्णच

एकनाथ पाटील - कोल्हापूर  शहरासह करवीर, शाहूवाडी, गडहिंग्लज आणि इचलकरंजी, आदी विभागांतील पोलीस उपअधीक्षक हे ‘असून अडचण, नसून खोळंबा’ असल्यासारखेच आहेत. त्यांची विभागातील पोलीस ठाण्यांवर वचक नसल्याने अधिकारी व कर्मचारी सुस्तावले आहेत. जिल्ह्यात खून, खुनाच्या प्रयत्नांसह दरोडा, घरफोड्या, चेन स्नॅचिंगसारख्या घटनांनी पुन्हा तोंड वर काढल्याने जिल्ह्यातील कायदा, सुव्यवस्था बिघडल्याचे चित्र आहे. वर्चस्ववादातून खून, खुनाचा प्रयत्न, तर पैशांच्या हव्यासापोटी शाळकरी मुलांचे दिवसाढवळ्या अपहरण, खंडणी, चेन स्नॅचिंग अशा गंभीर घटनांबरोबरच शहरासह इचलकरंजी, जयसिंगपूर, आदी शहरांमध्ये गँगवॉरच्या गुन्हेगारीनेही पोखरले आहे. बलात्काराच्या आणि छेडछाडीच्या घटनांनी तर कळस गाठल्याने महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. बालगुन्हेगारांची समस्याही भयावह रीतीने डोके वर काढताना दिसत आहे. दुचाकीवरून भरधाव येऊन महिलेच्या गळ्यातील मौल्यवान वस्तू हिसकावून ‘धूम स्टाईल’ने पलायन करण्याऱ्या चेन स्नॅचरना पकडण्याच्या नादात पोलीसच ‘घामाघूम’ झाले आहेत. विवाहबाह्य संबंध, आर्थिक किंवा मालमत्तेचा वाद, पूर्ववैमनस्य, हुंडाबळी, सावकारी, क्षणिक वादातून खुनाचे प्रमाण वाढत आहे. तरुणींना लग्नाचे, तर अल्पवयीन मुलींना खाऊचे आमिष दाखवून बलात्काराचे गुन्हे घडल्याची पोलीस दप्तरी नोंद आहे. ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांना पकडण्यात अद्यापही पोलिसांना यश आलेले नाही. पोलीस अधीक्षक डॉ. शर्मा हे या तपासामध्ये व्यस्त असल्याने त्यांना जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांकडे लक्ष देता आलेले नाही. कोल्हापूर शहर, करवीर, शाहूवाडी, गडहिंग्लज, इचलकरंजी, आदी विभागांतील पोलीस उपअधीक्षकांवर कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आहे, परंतु ते मनापासून ही जबाबदारी पार पाडत नसल्याचे दिसून येत आहे. वरिष्ठांचा वचक नसल्याने पोलीस स्थानक स्तरावरील अधिकारी व कर्मचारी पूर्णपणे सुस्तावल्याने कायदा व सुव्यवस्था ढासळली आहे. लँडमाफियांचे वाढते नेटवर्कशहरालगतच्या ग्रामीण भागांत प्रचंड प्रमाणात बांधकामे उभी राहत आहेत. गुन्हेगारी टोळ्यांचा वापर करून बांधकाम व्यावसायिक आणि लँडमाफिया सामान्य लोकांच्या जागा गिळंकृत करीत आहेत. या माफियांच्या जोरावर गुन्हेगारांनी आपले जाळे पसरविण्याचा प्रयत्न केला आहे. मुंबईपासून पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, बेळगाव, आदी परिसरातील गुन्हेगारांच्या टोळ्यांचे कोल्हापुरातील लँडमाफियांशी कनेक्शन असल्याचे समजते. सहा हत्यांचा तपास ?कणेरीवाडी येथील तलावात पोत्यात सापडलेला तरुणाचा मृतदेह त्यापाठोपाठ कात्यायनी परिसरात तरुणीचा निर्घृण खून, वाशी (ता. करवीर) येथील ‘सुतारकी’ नावाच्या उसाच्या शेतात अज्ञात पाच वर्षांच्या बालिकेचा मृतदेह पोत्यात बांधून ठेवल्याचे करवीर पोलिसांना आढळून आले. वाघबीळ घाटातील झुडुपात छिन्नविछिन्न अवस्थेत तरुणाचा मृतदेह करवीर पोलिसांनाच सापडला. जोतिबा-कुशिरेच्या शेतमाळावर आठ वर्षांच्या मुलीचा खून करून मृतदेह दफन केल्याचा आढळला. तो तरुण-तरुणी त्या दोन निष्पाप बालिका कोण ? त्यांचा खून कोणी केला ? हे सर्व प्रश्न आजही तसेच आहेत. शिवाजी पेठेतील हृषिकेश अनिल कोगेकर याचा कसबा वाळवेनजीक निर्घृण खून करण्यात आला. त्याचा शोध आजही लागलेला नाही.