शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

पुनर्वसनासाठी नशिबी हेलपाटे

By admin | Updated: July 25, 2015 01:13 IST

निधीची कमतरता : प्रकल्पास गती मिळण्याची गरज

रवींद्र येसादे - उत्तूर -गेली १५ वर्षे आंबेओहळ प्रकल्पासाठी शासनाने जमिनी ताब्यात घेतल्या असून, धरणग्रस्तांचे पुनर्वसन संथगतीने सुरू आहे. प्रकल्पातील एकूण बुडीत क्षेत्रात येणाऱ्या ३९५ हेक्टर क्षेत्रापैकी ३८५ हेक्टर क्षेत्राची संपादन कार्यवाही पूर्ण झाली असून, १०.०७ हेक्टर क्षेत्राचे संपादन अंतिम निवाड्यावर आहे. आम्हाला आमच्या हक्काच्या जमिनी हव्यात. त्या लाभक्षेत्रातून मिळाव्यात ही धरणग्रस्तांची भूमिका आहे. मात्र, लाभधारक जमिनी संपादन करावयास गेले असता मूळमालक त्यांना येऊ देत नाहीत. यामुळे कोर्टकचेऱ्या सुरू आहेत. यासाठी शासनाने कठोर भूमिका घेणे गरजेचे आहे. सांडवा क्षेत्रातील पुनर्वसनउत्तूर, करपेवाडी व आर्दाळ गावांमध्ये धरण पाया, सांडवा व खाणक्षेत्रातील प्रकल्पग्रस्तांना १२४ हेक्टर क्षेत्र देय होते. त्यानुसार उत्तूर व कडगाव येथे जमिनी उपलब्ध होत्या. धरणग्रस्तांच्या पसंतीनुसार काहींना जमिनींचे वाटप प्राधान्यक्रमानुसार झाले आहे.बुडीत क्षेत्रातील पुनर्वसनआर्दाळ, हालेवाडी, होन्याळी, महागोंड, वडकशिवाले, आदी गावांतील बुडीत क्षेत्रातील ३८७ हेक्टर देय होती. प्रकल्पांतर्गत ३५५ खातेदारांची स्वेच्छा पुनर्वसन मागणी आहे. मंजूर ५.३८ कोटींच्या स्वेच्छा अनुदानापैकी २.२५ कोटी अनुदानाचे वाटप झाले आहे. प्रकल्पात ८२२ खातेदार आहेत. ४६७ खातेदारांनी ६५ टक्के रक्कम शासनास भरणा केली आहे. त्यांना ३२८ हेक्टर पर्यायी जमीन देय असून, आजअखेर ५३ खातेदारांना ३२.० हेक्टर जमीन वाटप केली आहे. आर्दाळ, हालेवाडी, होन्याळी, महागोंड व वडकशिवाले या गावांमधील बुडीत क्षेत्रातील जमिनींचे वाटप सुरू आहे.प्रकल्पग्रस्तांना धरणग्रस्तांचे दाखले, भविष्यनिर्वाह भत्ता, गावठाण, आदी कामे ६० टक्क्यांपर्यंत पूर्ण आहेत. शासनदरबारी निधीची कमतरता असल्याने पुनर्वसन रखडले आहे.(समाप्त) करपेवाडीत गुंताकरपेवाडी येथील क्षेत्रावर मालकी हक्कासंबंधी शेतकरी विरुद्ध जगद्गुरू ट्रस्ट दावा चालू आहे. ३९ शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला मिळाला नाही. स्वेच्छा पुनर्वसन मोबदला वाटप नाही. सानुग्रह अनुदानाचे वाटप मंजूर असूनही मिळाले नाही. करपेवाडीच्या क्षेत्रावरील वर्ग-२ च्या शेऱ्याबाबत माहिती मिळत नसल्याने करपेवाडीकर आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. निधीची तरतूद झाल्यास हे सर्व प्रश्न सुटू शकतात.गावठाण सद्य:स्थितीउत्तूर, आर्दाळ, करपेवाडी, व्होन्याळी व हालेवाडी या गावांसाठी लिंगनूर येथे, तर महागोंड, वडकशिवाले या गावांसाठी कडगाव येथे गावठाण मंजूर आहेत. नागरी सुविधा पूर्ण होण्यासाठी जादा निधीची गरज असून, त्याचे काम संथगतीने सुरू आहे.