शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

"मुंबई मे हमला होनेवाला है", धमकीच्या मेसेजवर माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले..

By राजाराम लोंढे | Updated: August 20, 2022 13:17 IST

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंती निमित्त कोल्हापुरात सदभावना दौड

कोल्हापूर : मुंबईतील हल्याबाबत धमकीचा मेसेज आला असला तरी पोलीस यंत्रणा सतर्क आहे. असा कोणत्याही प्रकारचा हल्ला होणार नाही. याची काळजी पोलीस प्रशासन घेईल, याची मला खात्री असल्याची माहिती राज्याचे माजी महसूल मंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली. कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते.काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, आमदार पी. एन. पाटील यांच्या वतीने माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंती निमित्त कोल्हापुरात आयोजित केलेल्या सदभावना दौड कार्यक्रमासाठी बाळासाहेब थोरात कोल्हापुरात आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.दसरा चौक येथील शाहू बोर्डिंग हाऊस येथे बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते व शाहू छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत सदभावना ज्योत प्रज्वलित करण्यात आली. तेथून मिरवणूकीने ज्योत दिंडनेर्ली (ता. करवीर) येथील राजीव गांधी सूत गिरणीच्या कार्यस्थळावर नेण्यात आली. यावेळी आमदार पी. एन. पाटील, आमदार राजू आवळे, आमदार ऋतुराज पाटील, आमदार प्रा. जयंत आसगावकर, ‘गोकुळ’चे अध्यक्ष विश्वास पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पी. पाटील, श्रीपतरावदादा बँकेचे अध्यक्ष राजेश पी. पाटील, ॲड. सुरेश कुराडे, उद्योगपती व्ही. बी. पाटील, काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव बाजीराव खाडे, प्रदेश काँग्रेसचे सचिव तौसिफ मुल्लाणी, तालुकाध्यक्ष शंकरराव पाटील-वरणगेकर, महिला जिल्हाध्यक्ष सुप्रिया साळोखे, भारत पाटील-भुयेकर, धैर्यशील देसाई आदी उपस्थित होते.

पोलीस यंत्रणा अलर्टजी मुबारक हो, मुंबई मे ह मला होने वाला है २६/११ की नई ताजी याद दिलाएगा असा मेसेज मुंबई वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला शनिवारी रात्री आला आहे. त्यामुळे सर्व पोलीस ठाणे व यंत्रणा सज्ज करण्यात आल्या आहेत. पोलिस ट्रॅफिक कंट्रोलला शनिवारी २६/११ प्रमाणे  हल्ल्याची धमकी रात्री ११ च्या सुमारास मिळाली असे सूत्रांचे म्हणणे आहे. त्याचे 'लोकेशन ट्रेस' केल्यास ते भारताबाहेर असल्याचे आढळून येईल, असे मेसेंजरने सांगितले होते. मुंबईत हल्ला होईल, अशी धमकी संदेशवाहकाने दिली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरBalasaheb Thoratबाळासाहेब थोरातMumbaiमुंबईHigh Alertहाय अलर्ट