कोल्हापूर : दसरा व दिवाळी उत्सवाच्या निमित्ताने व्यावसायिक व ग्राहकांचा दुहेरी फायदा करून देणाऱ्या ‘लोकमत दीपोत्सव’ योजनेच्या बंपर ड्रॉ सोडतीतील विजेते बाळकृष्ण विश्वनाथ देशपांडे (रा.ब्रह्मेश्वर बाग, शिवाजी पेठ) यांना आज, मंगळवारी शानदार कार्यक्रमात ‘अल्टो-८००’ ही कार प्रदान करण्यात आली. उद्यमनगर येथील साई सर्व्हिस स्टेशन लिमिटेड येथे भारत डेअरीचे हितेश मेहता यांच्या हस्ते बाळकृष्ण देशपांडे यांना ‘अल्टो’ची चावी प्रदान करण्यात आली. यावेळी साई सर्व्हिस स्टेशन लिमिटेडचे सीईओ सिद्धेश्वर कोकणे, मे. अनंत गोपीनाथ चिपडे सराफचे बन्सीधर चिपडे, साई सर्व्हिस स्टेशन लिमिटेडचे असिस्टंट जनरल मॅनेजर प्रदीप वाघमोडे, सेल्स मॅनेजर आदिनाथ पाटील, ‘लोकमत’चे सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, सहायक सरव्यवस्थापक (रेस) संजय पाटील, जाहिरात विभागाचे उपव्यवस्थापक विवेक चौगुले, विद्या देशपांडे, अशोक स्वामी, आदी मान्यवरांची प्र्रमुख उपस्थिती होती. विविध व्यावसायिकांना व्यवसायाची स्वतंत्रपणे व किफायतशीर दरात दसरा-दिवाळीदरम्यान जाहिरात करून ग्राहकांना आकर्षित करता यावे, तसेच ग्राहकांचाही सणाचा आनंद बक्षिसांनी द्विगुणित व्हावा, यासाठी ‘लोकमत’तर्फे ‘दीपोत्सव २०१४’ या योजनेचे आयोजन केले होते. यापूर्वी दसरा व दिवाळी असे दोन ड्रॉ काढण्यात आले. १० डिसेंबरला या योजनेतील अंतिम बंपर ड्रॉ राजाराम कॉलेजमधील यशवंतराव चव्हाण सभागृहात काढण्यात आला. यामध्ये शिवाजी पेठेतील बाळकृष्ण विश्वनाथ देशपांडे यांना बंपर ड्रॉचे बक्षीस मिळाले. त्यांनी भारत डेअरी येथून खरेदी केली होती.बक्षीस मिळालेली कार घेण्यासाठी देशपांडे हे पत्नी विद्या देशपांडे व मित्र अशोक स्वामी यांच्यासोबत आले होते. आपल्याला मिळालेली ही कार पाहून देशपांडे दाम्पत्याच्या चेहऱ्यावर विलक्षण आनंद दिसला.‘लोकमत दीपोत्सव’ योजनेच्या बंपर ड्रॉ सोडतीतील विजेते बाळकृष्ण देशपांडे यांना ‘अल्टो-८००’ कारचे मंगळवारी शानदार कार्यक्रमात वितरण करताना भारत डेअरीचे हितेश मेहता. शेजारी ‘लोकमत’चे सहायक सरव्यवस्थापक (रेस) संजय पाटील, सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, साई सर्व्हिसचे सीईओ सिद्धेश्वर कोकणे, मे. अनंत गोपीनाथ चिपडे सराफचे बन्सीधर चिपडे, विद्या देशपांडे, अशोक स्वामी, साई सर्व्हिसचे प्रदीप वाघमोडे, आदिनाथ पाटील.
देशपांडे यांना ‘अल्टो’ प्रदान
By admin | Updated: December 24, 2014 00:19 IST