शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

प्रबोधनाच्या ‘देशमुख पॅटर्न’ला येणार आता जोर इंद्रजित देशमुख आज सेवानिवृत्त : महिला, मुली, विद्यार्थ्यांना प्रशिक्षण, विचारांचा जागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 01:07 IST

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची मुलाखत ठरलेली. त्याआधी चार दिवस म्हणजेच २ आॅगस्ट १९९२ ला हा युवक मुलाखतीसाठी जीपहून मुंबईला निघाला होता.

<p>समीर देशपांडे।कोल्हापूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची मुलाखत ठरलेली. त्याआधी चार दिवस म्हणजेच २ आॅगस्ट १९९२ ला हा युवक मुलाखतीसाठी जीपहून मुंबईला निघाला होता. खंबाटकीच्या घाटात जीप आणि एसटीची टक्कर झाली. शेजारचे दोघे ठार झाले. याचा पाय मोडला, छातीला मार लागला. तशातही स्ट्रेचरवरून मुलाखत दिली; पण या अपघाताने या युवकाच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. जणू पुनर्जन्मच झाला. आता हा नवा जन्म समाजाच्या भल्यासाठी सार्थकी लावण्याचा त्याने निर्धार केला आणि गेली २५ वर्षे इंद्रजित देशमुख नावाचा अधिकारी याच निर्धाराने कार्यरत राहिला.कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख हे आज स्वेच्छानिवृत्त होत आहेत. देशमुख यांनी अवेळी घेतलेली स्वेच्छानिवृत्ती वेदनादायी ठरणारी आहे. देशमुख यांचे वडील दोन वेळा आमदार होते. सांगली जिल्ह्णातील खानापूर तालुक्यातील माहुली येथे घरची शेती. मनात आणलं असतं तर देशमुखी थाटात गावात रूबाब गाजवणं त्यांना अशक्य नव्हतं; पण विचार पक्का झाला होता आणि मग गटविकास अधिकारी म्हणून पंचवीस वर्षांपूर्वी शिरोळचा कार्यभार स्वीकारला.शिरोळनंतर कराडला गटविकास अधिकारी, कोल्हापुरात ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य, जलस्वराज्य, उपआयुक्त विकास या सर्व पदांवर काम करत असताना आपण कुणासाठी काम करत आहोत याचे भान सुटले नाही. जोडीला ज्ञानेश्वर, तुकाराम, कबीर होते. एकीकडे शासकीय कामकाज पाहत असतानाच गावोगावी देशमुख यांनी प्रबोधनाचा जागर सुरू केला.भ्रष्टाचारमुक्तीपासून ते व्यसनमुक्तीपर्यंत आणि ग्रामविकासापासून ते राष्ट्रीय चारित्र्यापर्यंतची मांडणी होऊ लागली. पण ‘घेणार नाही, देणार नाही’ यामुळेही अडचण होऊ लागली आणि अखेर स्वेच्छानिवृत्तीचा निर्णय झाला. आता प्रबोधनाचा देशमुख पॅटर्न जोमात राहणार हे नक्की.शिवम् प्रतिष्ठानची स्थापनानव्या पिढीला सुजाण करण्याची गरज असल्याने, मग कराड तालुक्यातील घारेवाडी इथं शिवम् प्रतिष्ठानची स्थापना झाली. हजारो युवकांसाठी शिबिरे, महिला, मुलींना प्रशिक्षण. वर्षभर उपक्रम सुरू झाले. संपूर्ण महाराष्ट्रभर हा विचारांचा जागर सुरू असताना नाना पाटेकर यांच्यापासून मकरंद अनासपुरे यांच्यापर्यंत अनेकांशी संपर्क आला. हे सर्व सुरू असताना शासकीय जबाबदाऱ्या वाढतच होत्या.