शहरं
Join us  
Trending Stories
1
हनी ट्रॅप प्रकरणात भाजपा नेत्याच्या निकटवर्तीयाला मुंबईत अटक; अनेक मोठी नावे उघड होणार
2
ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफ मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, आजपासून संसद अधिवेशन; सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार
3
आजचे राशीभविष्य, २१ जुलै २०२५: नोकरी - व्यवसायात लाभदायी अन् यशदायी दिवस
4
उड्डाण करताच डाव्या बाजूचं इंजिन पेटलं; आगीमुळे बोईंगचे इमर्जन्सी लँडिंग
5
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
6
आधी ‘तिने’ तीन कोटी उकळले,  नंतर आणखी १० कोटी मागितले! ‘हनी ट्रॅप’ची चर्चा
7
ईडी कोणी ड्रोन नाही की सुपरकॉप नाही...मद्रास उच्च न्यायालयाचे ईडीच्या कार्यशैलीवर ताशेरे
8
हे कार्यकर्ते आहेत की गुंडांच्या टोळ्या?
9
रुग्णांसाठी समुद्रात उतरणार हेलिकॉप्टर..! मुंबईत कोस्टल रोडवर 'सी-हेलिपॅड'ची संकल्पना
10
हेरगिरी, ‘हनिट्रॅप’ आणि लाखोंची हकालपट्टी! हेरगिरीच्या संशयामुळे अफगाण निर्वासितांचे हाल
11
कोल्हापुरी चप्पल ‘चोरण्याची’ हिंमतच होऊ नये म्हणून...
12
योगींचा दिल्ली दौरा अन् प्रदेशाध्यक्ष निवडीची चर्चा; ओबीसी चेहरा किंवा महिला नेत्याची होऊ शकते निवड
13
नोकरीसाठी अडचण नको म्हणून चक्क पोटच्या मुलीलाच विकले
14
हवाई सुंदरीवर अत्याचार; क्रू मेंबरला अटक, मीरा रोड येथील घटना
15
प्रचंड उष्म्यामुळे विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणावर होतोय परिणाम, दीड वर्षांपर्यंत होऊ शकते घट
16
जगातील कोणीही भारताला आदेश देऊ शकत नाही, ट्रम्प यांचा दावा अन् उपरराष्ट्रपतींचे खडेबोल
17
संपादकीय : घोषणा नको, कृती हवी! दहशतवादाविरोधात भारताला आत्मनिर्भर व्हावे लागेल
18
इस्रायल की सशस्त्र टोळ्यांचा हल्ला? गाझामध्ये मदतीची प्रतीक्षा करणाऱ्यांवरच गोळीबार, ७३ जण ठार
19
तरुणांना भाषणबाजी नको, रोजगार हवा! राहुल गांधी यांनी व्यक्त केली चिंता
20
कृषिमंत्री कोकाटेंच्या मोबाइलवर पत्ते; विधानपरिषदेतील व्हिडीओने खळबळ

‘शहर वाहतूक’च्या नवीन इमारतीस प्रशासनाचाच खोडा

By admin | Updated: April 20, 2015 00:02 IST

स्वजागेत स्थलांतर कधी ? : एक वर्षापासून पाठपुरावा करूनही दुर्लक्ष

एकनाथ पाटील/ कोल्हापूर : शहर वाहतूक शाखेचा पोलीस मुख्यालय येथील स्वत:च्या जागेत कार्यालय बांधण्याचा प्रस्ताव गेल्या एक वर्षापासून जिल्हा नियोजन समितीकडे धूळखात पडला आहे. जिल्हा प्रशासनानेच या प्रस्तावास खोडा घातल्याने या कार्यालयाची अवस्था ‘ना घर का, ना घाट का’ अशी आहे. कार्यालयाची दुरवस्थाजिल्हा पोलीस दलांतर्गत शहर वाहतूक शाखेचे कार्यालय सुरुवातीस महापालिका चौकातील इमारतीमध्ये सुरू करण्यात आले. ही जागा रस्ता रुंदीकरणामध्ये गेल्याने महापालिका प्रशासनाने या कार्यालयास १९९० मध्ये नागाळा पार्कातील जयंती नाल्याशेजारील पंप हाऊस जवळील गट नं. ८०२, सी वॉर्ड ची १२ बाय २३ हे शेडवजा खोली उपलब्ध करुन दिली. त्यामुळे या कार्यालयाचे नामांतर ‘शहर वाहतूक शाखा कार्यालय’ करण्यात आले. सध्या कार्यालयाच्या छताचे सिमेंट पत्रे जीर्ण झाले असून पावसाळ्यात ठिकठिकाणी पाणी गळते. त्यामुळे सरकारी किमती साहित्याचे व महत्त्वाच्या कागदपत्रांचे नुकसान होत आहे. कार्यालयाच्या आतील व बाहेरील फरशी खराब झाली आहे. इमारतीच्या उजव्या बाजूस असलेल्या दोन निलगिरीच्या झाडांची उंची मोठ्या प्रमाणात वाढून फांद्या अधिकच विस्तीर्ण झाल्या आहेत. त्यामुळे अपघात होऊन जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच झाडांची मुळे इमारतीच्या खालून गेल्याने इमारतीच्या भिंतींना तडे जावून भेगा पडलेल्या आहेत. ४० लाखांचा इस्टिमेंट प्लॅन शहरातील रहदारीस अडथळा ठरणारी तसेच मोटार वाहन नियमांचे उल्लंघन करणारी वाहने क्रेनद्वारे टोर्इंग करून या ठिकाणी आणली जातात. ती सुस्थितीत ठेवण्यासाठी पुरेशी जागा येथे नाही. कारवाई केलेली वाहने परत घेण्यासाठी तडजोड शुल्क भरण्यासाठी व इतर कार्यालयीन कामकाजासाठी अनेक नागरिक येथे येत असतात तसेच ४ पोलीस अधिकारी व १६१ पोलीस कर्मचारी व ५ महिला पोलीस कर्मचारी कामकाज करत आहेत. कार्यालयाच्या आवारात शौचालयाची सोय नसल्याने फार मोठी गैरसोय होत आहे. वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी या शाखेचे कार्यालय सक्षम असणे गरजेचे आहे. त्यासाठी स्वत:ची सर्वसोयीनीयुक्त अशी सुसज्ज इमारत असणे आवश्यक असल्याने पोलीस मुख्यालय येथे पोलीस दलाची जागा विकसित करणे गरजेचे आहे. या ठिकाणी इमारत बांधणीसाठी सुमारे ४० लाख किमतीचा इस्टिमेट प्लॅन सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तयार करून तो निधी मंजुरीसाठी जिल्हा नियोजन समितीकडे पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी सादर केला आहे. शहर वाहतूक शाखेचे कार्यालय पोलीस मुख्यालय येथील नियोजित जागेत बांधण्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडे निधी मंजुरीसाठी प्रस्ताव सादर केला आहे, परंतु त्यास अद्याप मंजुरी मिळालेली नाही. -आर. आर. पाटील, पोलीस निरीक्षक