शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

‘झूम’वर उपमहापौरांना तीन तास रोखले

By admin | Updated: June 8, 2015 00:48 IST

झूममधील कचऱ्याची दुर्गंधी : तीन तासांनी आयुक्त आल्यानंतर सुटका; लाईन बझारमधील संतप्त नागरिकांकडून प्रशासन धारेवर

कोल्हापूर : लाईन बझार येथील झूम कचरा प्रकल्पातून रविवारी सकाळी मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येऊ लागली. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी येथे येणाऱ्या कचऱ्याच्या गाड्या अडवून धरल्या. यानंतर मनधरणी करण्यासाठी सकाळी आठच्या सुमारास आलेले स्थानिक नगरसेवक चंद्रकांत घाटगे व उपमहापौर मोहन गोंजारे तसेच मुख्य आरोग्य निरीक्षकांसह आलेल्या अधिकाऱ्यांना तब्बल तीन तास घेराव घालून रोखून धरले. अकरा वाजता आयुक्त पी. शिवशंकर यांनी घटनास्थळी भेट देऊन येथील कचऱ्याचा लवकरच उठाव करू, असे आश्वासन दिल्यानंतर उपमहापौरांसह या अधिकाऱ्यांची सुटका झाली. गेल्या तीन वर्षांपासून झूम प्रकल्पातील कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात आलेली नाही. या कचऱ्याचा वास परिसरात नेहमी दरवळत असतो. डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अनेक वेळा मोर्चा आंदोलने करून नागरिकांनी झूमविरोधात आक्रोश केला. यातच गेल्या दोन दिवसांपासून लाईन बझार परिसरात पावसानंतर मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली. नागरिकांनी तक्रार करूनही महापालिका प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. यातच पावसामुळे कचऱ्यातून निघणारे काळे पाणी (लिचड) बाहेर जाण्यासाठी झूमशेजारीच चर मारण्यात आली आहे. त्यामुळे कीटक व डासांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होत आहे. परिणामी चिडलेल्या नागरिकांनी सकाळी साडेसात वाजता झूम येथे कचरा ढकलण्याचे सुरू असलेले काम बंद पाडले. तसेच कचऱ्याच्या गाड्या रोखून धरल्या.नागरिकांची मनधरणी करण्यासाठी स्थानिक नगरसेवक चंद्रकांत घाटगे व त्यानंतर उपमहापौर मोहन गोंजारे, मुख्य आरोग्य निरीक्षक डॉ. विजय पाटील, आरोग्य निरीक्षक निखिल पाडळकर आले. लवकरच येथील कचऱ्यावर प्रक्रिया करून तो हलविला जाईल, असे आश्वासन त्यांनी नागरिकांना दिले. मात्र नागरिकांनी आयुक्तांनी येऊन परिस्थितीची पाहणी केल्याखेरीज कोणासही येथून न सोडण्याचा निर्धार केला. तब्बल तीन तास उपमहापौरांसह अधिकाऱ्यांना नागरिकांनी धारेवर धरले. आयुक्त पी. शिवशंकर यांनी अकराच्या सुमारास झूम प्रकल्पास भेट दिली. त्यांनी नागरिकांचे म्हणणे ऐकूण घेतले. काळे पाणी (लिचड) बाहेर जाण्यासाठी मारलेली चर तत्काळ बुजविण्याचे त्यांनी आदेश दिले. उघड्या कचऱ्यावर औषध फवारणी करून डास व इतर कीटक तयार होणार नाहीत, याची काळजी घेण्याच्या सूचना आरोग्याधिकाऱ्यांना दिल्या. आयुक्तांनी लवकरच येथील कचरा हटविण्यात येईल. यानंतर येथे थेट कचऱ्याची साठवूणक न करता त्यावर तत्काळ प्रक्रिया केली जाईल, असे आश्वासन दिले. यानंतर अधिकारी व लोकप्रतिनिधींची सुटका झाली. यावेळी सुनील जाधव, अभिजित कवठेकर, नितीन कवठेकर, राजेंद्र जाधव, आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवख्या अधिकाऱ्याची अरेरावीठोक मानधनावरील आरोग्य निरीक्षक निखिल पाडळकर याने येथील नागरिकांना दमदाटी करण्याचा प्रयत्न केला. निखिल याचे वडीलही आरोग्य विभागाच्या सेवेत आहेत. कायम नोकरीत नसतानाही नागरिकांशी उद्धट व दमदाटीची भाषा करणाऱ्या निखिल पाडळकर याला नागरिकांनीही चांगलेच धारेवर धरले. आयुक्त पी. शिवशंकर यांच्याकडे पाडळकर पिता-पुत्राच्या कारनाम्याबाबत नागरिकांनी तक्रार केली. तसेच निखिल पाडळकर याला समज द्यावी, असा प्रकार पुन्हा घडल्यास सेवेतून कमी करण्याची मागणी नागरिकांनी केली.