शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

कर्जमाफीचे साडेसहा हजार कोटी रुपये खात्यावर जमा : मुख्यमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 01:24 IST

वारणानगर/कोडोली : राज्यातील १५ लाख ४२ हजार शेतकºयांच्या कर्जमाफीचे साडेसहा हजार कोटी रुपये शुक्रवारी शासनाने त्यांच्या खात्यावर वर्ग केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिली

ठळक मुद्देपंधरा दिवसांत सर्व रक्कम देणार : राजर्षी शाहूंच्या नावे मुंबईत ‘कोल्हापूर भवन’दिल्लीत जसे प्रत्येक राज्याचे भवन आहे, तसे मुंबईतही प्रत्येक जिल्ह्याचे भवन व्हावे व त्याची सुरुवात कोल्हापूरपासून

वारणानगर/कोडोली : राज्यातील १५ लाख ४२ हजार शेतकºयांच्या कर्जमाफीचे साडेसहा हजार कोटी रुपये शुक्रवारी शासनाने त्यांच्या खात्यावर वर्ग केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिली. उर्वरित प्रत्येकी दहा लाख शेतकºयांना दोन टप्प्यांत येत्या १५ दिवसांत कर्जमाफीची रक्कम दिली जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. राजर्षी शाहू महाराज यांच्या नावाचे कोल्हापूर भवन नवी मुंबईत उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याची घोषणाही त्यांनी केली.

आसुर्ले-पोर्ले येथील दत्त-दालमिया या खासगी कारखान्याचे सहकारीकरण करण्यात येईलच; परंतु या कामात कोण अधिकारी आडवा येत असेल, तर त्याच्यावर कारवाई करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.प्राथमिक शिक्षकांचे सुगम-दुर्गम बदल्यांचे धोरण सरकार बदलणार नाही, परंतु त्यांच्या बदल्या मे मध्येच करण्यात येतील, असे स्पष्ट करीत मुख्यमंत्री म्हणाले, नाभिक समाजाबद्दल मनात आदराची भावना असून, माझ्या वक्तव्याने त्यांच्या भावना दुखावल्या असल्यास त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी जाहीर दिलगिरी व्यक्त केली व या विषयावर आता पडदा टाकला जावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. गावठाणवाढीचे अधिकार आता जिल्हाधिकाºयांनाच दिले असल्याचे त्यांनी सांगितले.

येथील वारणा उद्योग समूहाचे नेते विनय कोरे यांनी मुख्यमंत्र्यांशी दिलखुलास संवाद कार्यक्रमाचे आयोजन केले होते. तात्यासाहेब कोरे इंजिनिअरिंग कॉलेजच्या पटांगणावर हा कार्यक्रम झाला. त्यास लोक प्रचंड संख्येने उपस्थित होते. तिथे मुख्यमंत्र्यांशी सुमारे तासभर हा संवाद झाला. व्यासपीठावर मुख्यमंत्र्यांसह कोरे व पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे तिघेच उपस्थित होते. अन्य मान्यवर व्यासपीठासमोर बसले होते. सुमारे तासभर हा संवाद रंगला. मुख्यमंत्र्यांनी लोकांनी विचारलेल्या १६ प्रश्नांना खुलासेवार उत्तरे दिली. ऊस उत्पादकांच्यावतीने त्यांना पहिलाच प्रश्न कोडोलीच्या आनंदराव भोसले, गुरुजी यांनी विचारला. नियमित कर्जफेड करणाºया शेतकºयांना सवलती मिळत नसल्याची तक्रार त्यांनी केली. त्यास उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले,‘तुम्ही वेळेत कर्ज भरता याबद्दल मी तुमचे आभार मानतो. शेतकरी सन्मान योजना आम्ही आणली ती थकबाकीदार शेतकºयांसाठी. आजारी भावास औषध दिल्यावर जो सुदृढ आहे त्याने मला ते का औषध दिले नाही असे म्हणू नये. परंतु आम्ही नियमित कर्जफेड करणाºया शेतकºयांनाही वाºयावर सोडणार नाही. सध्या त्यांना प्रोत्साहनपर रक्कम देत आहोत, ही रक्कमही वाढवून देण्याचा सरकारचा विचार आहे.’

वाडीरत्नागिरीच्या सरपंच रिया सांगळे यांनी मुंबईत शाहूंच्या नावाने कोल्हापूर भवन उभारण्यासाठी सरकारने जागा द्यावी, अशी मागणी केली. त्यास सहमती देत मुख्यमंत्र्यांनी त्यासाठी नवी मुंबईत जागा देण्याचे जाहीर केले. दिल्लीत जसे प्रत्येक राज्याचे भवन आहे, तसे मुंबईतही प्रत्येक जिल्ह्याचे भवन व्हावे व त्याची सुरुवात कोल्हापूरपासून करण्यात येत असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

प्रास्ताविकात विनय कोरे यांनी हा कार्यक्रम लोकशाही बळकट करणारा असल्याचे सांगितले. यावेळी शोभाताई कोरे, निपुण कोरे, विश्वेश कोरे, शुभलक्ष्मी कोरे, स्नेहा कोरे, वारणा दूध संघाचे अध्यक्ष भाऊसाहेब गुळवणी, कार्यकारी संचालक येडूरकर, सुराज्य फौंडेशनचे एन. एच. पाटील, समित कदम, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, आदी मान्यवर उपस्थित होते. प्रा. जीवन शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास येण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी तात्यासाहेब कोरे यांच्या समाधीस्थळास भेट देऊन अभिवादन केले व कारखाना परिसराची माहिती घेतली.-------------सावकर यांच्या मुलीचा प्रश्नविनय कोरे म्हणाले,‘मुख्यमंत्र्यांनाच थेट प्रश्न विचारायचे म्हटल्यावर पहिला प्रश्न माझी मुलगी ईशानीने मीच विचारणार असल्याचे सांगितले. तिची तळसंदेची मैत्रीण कोळी ही एसटी बसमध्ये चढताना तिचा अपघाती मृत्यू झाला. मग मुख्यमंत्री एसटीच्या जादा गाड्या का सोडत नाहीत, असे तिचे म्हणणे असल्याचे कोरे यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी जिथे जास्त विद्यार्थी त्या मार्गावर एसटीच्या फेºया वाढविण्याच्या सूचना दिल्या जातील, असे जाहीर केले.दूध पावडर शालेय पोषण आहाराततळसंदेच्या धनाजी चव्हाण यांनी दूध पावडरचे उत्पादन जास्त झाल्यावर दर पडतात तेव्हा शालेय पोषण आहारात पावडरचा समावेश करण्याविषयी विचारणा केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी सांगितले की,‘दुधाचा धंदा वारणेने महाराष्ट्राला शिकवला. या धंद्यात चढउतार जास्त आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात दर घसरले की त्याचा फटका दूध उत्पादकांना बसतो. ते टाळण्यासाठी अंगणवाड्यांना पूरक आहार व शालेय पोषण आहारातही या पावडरचा वापर करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्याचे निकष तयार करण्यात येत आहेत. त्या पावडरपासून विद्यार्थ्यांना काही हानीकारक होऊ नये, याची सरकार काळजी घेत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.नाभिक समाजाची दिलगिरी..सुनील शिंदे यांनी नाभिक समाजाचा अवमान झाल्याबद्दल विचारणा केली. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले, ‘नाभिक समाजाबद्दल माझ्या मनात प्रचंड आदर आहे. म्हणून त्या समाजातील तरुणांना नुसत्या प्रमाणपत्रावर कर्ज देण्याची योजना मी सुरू केली आहे. परंतु पुणे जिल्ह्यातील एका कार्यक्रमात जुन्या सरकारने केलेल्या कामांचा दाखला देताना नाभिक समाजाचे मी उदाहरण दिले. त्यामध्ये त्या समाजाच्या भावना दुखावण्याचा हेतू नव्हता. तरीही तसे काही झाले असल्यास मी यापूर्वीच त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे व आताही त्याबद्दल जाहीर दिलगिरी व्यक्त करतो. नाभिक समाजाच्या आडून या वादाला कुणी हवा देण्याचा प्रयत्न करू नये.सुगम-दुर्गमचे धोरण बदलणार नाहीशिक्षक संघटनेचे नेते राजाराम वरूटे यांनी प्राथमिक शिक्षकांचे प्रश्न मांडले. त्यास उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी सुगम-दुर्गमचे धोरण बदलणार नसल्याचे सांगून टाकले, त्यास लोकांनीही टाळ््यांचा कडकडाट करून प्रतिसाद दिला. बदल्यांचे आदेश मे महिन्यातच काढले जातील. २००५ ची पेन्शन योजना बदलता येणार नाही, कारण ती ट्रेन आता खूप पुढे गेली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. शिक्षकांना एमएससीआयटीचे प्रमाणपत्र देण्यास २०१८ पर्यंत मुदत देण्याचे त्यांनी मान्य केले. नगरपालिका व महापालिका शिक्षण मंडळाच्या शिक्षकांच्या पगारासाठी सरकार साहाय्यक अनुदान देते कारण या संस्थांना शिक्षण कर वसुलीचे अधिकार आहेत. त्यामुळे त्यांचा पगार शासनातर्फे करता येणार नाही, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.बचत गटांना प्रोत्साहनवाघवे येथील सुनिता पाटील यांनी महाराष्ट्रात सध्या बचत गटांची चळवळ ही भिशीसारखी बनली असल्याचे सांगून, बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनांना सरकारने बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची मागणी केली. त्यास सहमती देत मुख्यमंत्री म्हणाले,‘राज्यात यशस्वी उद्योग करणारे २ लाख १२ हजार बचत गट आहेत. या गटांशी तब्बल २७ लाख परिवार जोडले गेले आहेत. त्यामुळे या चळवळीला बळ देण्याचेच सरकारचे धोरण असून, आम्ही बचत गटाच्या उत्पादनांना विक्रीसाठी खास मॉल सुरू करणार आहोत. सरकारतर्फे विक्री प्रदर्शनेही आयोजित करण्याचे नियोजन आहे.’प्रेरणेची भूमी..विनय कोरे यांनी या कार्यक्रमाचे अत्यंत नेटके आयोजन करून मुख्यमंत्र्यांचे मन जिंकले. वारणेची भूमी ही प्रेरणेची भूमी असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले. या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी प्रश्नकर्त्याचे समाधान होईपर्यंत उत्तर दिले. कोणतीही चिठ्ठी अथवा कागद न हातात घेता त्यांनी दिलेल्या उत्तराने उपस्थितही सर्व खूश झाले. मुख्यमंत्री प्रत्येक प्रश्नकर्त्याला तुम्ही अत्यंत चांगला प्रश्न विचारला असे सांगून प्रोत्साहित करीत होते.कोल्हापुरातही घरकुल योजनावरेवाडी (ता. शाहूवाडी) येथील कृष्णात खोत यांनी माथाडी कामगारांसाठी घरकुल योजना करण्याची मागणी केली. मुंबईच्या धर्तीवर कोल्हापुरातही अशी घरकुल योजना केली जाईल, त्याचा प्रस्ताव विनय कोरे यांनी सादर करावा, असे मुख्यमंत्र्यांनी सुचविले.जलयुक्त शिवारज्या प्रदेशात पाऊस जास्त लागतो व जमीन उंचसखल आहे, अशा कोकण व कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा, शाहूवाडी, गगनबावडा, राधानगरी अशा तालुक्यांतही उपयुक्त ठरू शकेल, अशी जलयुक्त शिवार योजना राबविण्यात येणार आहे. दापोली कृषी विद्यापीठास त्यासंबंधीचे नवे निकष तयार करण्याच्या सूचना केल्या असून, दोन महिन्यांत ही नवी योजना लागू करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. करंजफेण (ता. शाहूवाडी) येथील युवराज पाटील यांनी हा प्रश्न विचारला.यांनीही विचारले प्रश्नया कार्यक्रमात सागर मोहिते (मोहरे), इरिगेशन फेडरेशनचे अध्यक्ष विक्रांत पाटील (किणी),माजी आमदार राजीव आवळे, नितीन पाटील, (बाजारभोगाव), कोतोलीचे सरपंच अशोक कुंभार, आम्रपाली गौतम कांबळे,