शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

आॅनलाईन व्यवहार न करणाऱ्या १५ रेशन दुकानांची अनामत जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2019 15:55 IST

कोल्हापूर जिल्ह्याचे आॅनलाईन रेशन व्यवहार हे ९४ टक्के असूनही करवीर तालुक्यातील दुकानांमध्ये ८० टक्केच्या आतच व्यवहार होत आहेत. हे चित्र अनेक दिवसांपासून कायम राहील्याने जिल्हा पुरवठा विभागाने धडक कारवाई करत १५ दुकानांची अनामत रक्कम जप्त केली. शहरासह इतर तालुक्यात ही अशाच पध्दतीने मोहिम राबविणार असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी अमित माळी यांनी शनिवारी सांगितले.

ठळक मुद्देआॅनलाईन व्यवहार न करणाऱ्या १५ रेशन दुकानांची अनामत जप्त: जिल्हा पुुरवठा विभागाकडून करवीर तालुक्यात कारवाई : इतर तालुक्यात सुरु होणार मोहिम

कोल्हापूर : जिल्ह्याचे आॅनलाईन रेशन व्यवहार हे ९४ टक्के असूनही करवीर तालुक्यातील दुकानांमध्ये ८० टक्केच्या आतच व्यवहार होत आहेत. हे चित्र अनेक दिवसांपासून कायम राहील्याने जिल्हा पुरवठा विभागाने धडक कारवाई करत १५ दुकानांची अनामत रक्कम जप्त केली. शहरासह इतर तालुक्यात ही अशाच पध्दतीने मोहिम राबविणार असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी अमित माळी यांनी शनिवारी सांगितले.आॅनलाईन द्वारे रेशनवरील व्यवहारांचे प्रमाण कमी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर दोन महिन्यांपूर्वी जिल्हा पुरवठा कार्यालयाकडून करवीर तालुक्यातील संबंधित रेशन दुकानांना नोटीस पाठविण्यात आल्या. परंतु त्यानंतरही व्यवहाराचे प्रमाण कमीच राहीले. जिल्ह्यातील इतर दुकानांमधील आॅनलाईन व्यवहाराचे प्रमाण हे ९४ ते ९५ टक्केच्या आसपास आहे.

मात्र, करवीरमधील या दुकानांमध्ये ८० टक्केच्या आतच व्यवहार झाल्याचे निदर्शनास आल्याने जिल्हा पुरवठा विभागाने त्यांना नोटीस बजावून म्हणणे मांडण्याचे निर्देश दिले. त्यावर दहा दुकानांनी याकडे पाठ फिरविली तर पाच जणांनी उपस्थित राहून म्हणणे मांडले असले तरी समाधानकार खुलासा करु शकले नाहीत. त्यामुळे पुरवठा विभागाने नुकतीच धडक कारवाई केली.

यामध्ये शेतकरी सहकारी संघ,शाखा(कांचनवाडी), शेतकरी सहकारी संघ शाखा (परिते), शेतकरी सहकारी संघ शाखा (बालिंगा), उत्तम रास्त भाव धान्य दुकान (नागदेववाडी), ज्ञानेश्वर विकास सेवा संस्था (शिंगणापूर), व्ही.टी. भिवटे रास्त भाव धान्य दुकान (उचगाव), रासाई विकास सेवा संस्था (घानवडे), श्रीराम विकास सेवा संस्था (शिंगणापूर), महालक्ष्मी महिला बचत गट (कांचनवाडी) यांच्यावर शंभर टक्के अनामत रक्कम प्रत्येकी दोन हजार रुपये जप्त करण्याची कारवाई केली आहे. तर छत्रपती विकास सेवा संस्था (उचगाव), पांडुरंग विकास सेवा संस्था (सांगरुळ), हनुमान विकास सेवा संस्था (शिये), कुरुकली विकास सेवा संस्था (कुरुकली), शेतकरी सहकारी तंबाखू खरेदी-विक्री संघ (शिरोली दुमाला) यांच्यावर पन्नास टक्के अनामत रक्कम एक हजार रुपये जप्त करण्याची कारवाई करण्यात आली.

रेशनवरील आॅनलाईन व्यवहार सातत्याने कमी होत असल्याने संबंधित दुकानांवर कारवाई करण्यात आली आहे. यातील त्रुटींची पुनरावृत्ती झाल्यास या दुकानांचे परवाने रद्द केले जातील. लवकरच जिल्हयात सर्वच ठिकाणी ही कारवाई होणार केली जाईल.-अमित माळी,जिल्हा पुरवठा अधिकारी 

 

टॅग्स :Governmentसरकारdigitalडिजिटलkolhapurकोल्हापूर