शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

जातीयवादी सरकार हद्दपार करा: रमेश बागवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 01:14 IST

हातकणंगले / आळते : नोटाबंदी, प्लास्टिक बंदी, जीएसटी अशा जाचक अटी लावून देशातील सर्वसामान्य जनतेला भाजप सरकारने हैराण केले आहे. गो-हत्याच्या नावाखाली जातीय तणाव निर्माण करून धर्माधर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम गेल्या चार वर्षांत या सरकारने केली आहे. अशाप्रकारांमुळे देशाच्या अखंडतेला धोका निर्माण झाला आहे. अशा या जातीयवादी सरकारला देशातून ...

हातकणंगले / आळते : नोटाबंदी, प्लास्टिक बंदी, जीएसटी अशा जाचक अटी लावून देशातील सर्वसामान्य जनतेला भाजप सरकारने हैराण केले आहे. गो-हत्याच्या नावाखाली जातीय तणाव निर्माण करून धर्माधर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम गेल्या चार वर्षांत या सरकारने केली आहे. अशाप्रकारांमुळे देशाच्या अखंडतेला धोका निर्माण झाला आहे. अशा या जातीयवादी सरकारला देशातून हद्दपार करा, असे आवाहन माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांनी केले.हातकणंगले येथे आयोजित केलेल्या राष्टÑीय कॉँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात बागवे बोलत होते.ते म्हणाले, मोदी सरकारने देशातील तरुणांना व शेतकऱ्यांना खोटी, मोठमोठी आश्वासने देऊन लोकांची दिशाभूल केली. शेतकºयांच्या समस्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून शेतकºयांना आत्महत्येस प्रवृत्त करण्याचे काम या सरकारने केले. सामान्य माणसांचे भले करण्यापेक्षा उद्योगपतींना आश्रय देऊन देशाची लूट करण्याचे काम गेल्या चार वर्षांमध्ये हे सरकार करीत आहे. देशातील कायदा व सुव्यवस्था धाब्यावर बसवून संविधान बदलण्याचे षड्यंत्र सुरू आहे. त्यासाठी आपण सर्वांनी सावध राहिले पाहिजे, हे सरकार सर्वच पातळ््यांवर अपयशी ठर आहे असे रमेश बागवे यांनी सांगितले.यावेळी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील म्हणाले, जिल्ह्यामध्ये कॉँग्रेसची राजकीय स्थिती आता भक्कम होत असून गटतट विसून एकदिलाने काम केल्यास जिल्ह्यातून काँग्रेसचे जास्तीत जास्त आमदार येतील.यावेळी राज्याच्या सरचिटणीस अ‍ॅड. मनीषा रोटे, बाजीराव सातपुते, भगवान जाधव, राजूबाबा आवळे, बादशहा मुजावर, संदीप कारंडे, अरुण जानवेकर, डॉ. सनत खोत यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमास अमर पाटील, उत्तम पाटील, बाळगोंडा पाटील, शकील अत्तार, शशिकांत खवरे, राजू कचरे, विद्याताई चव्हाण, मनीषा पांडव, रमेश पाटोळे, युवराज पाटील, भैरू पवार, सुरेश नाईक, राजू भोसले, एस. के. माळी, पोपट इंगवले, दौलत पाटील, बबन पाटील, बाळासाहेब खाडे, संजय आवळे यांच्यासह तालुक्यातील कार्यकर्ते व मान्यवर उपस्थित होते.