दुर्गमानवाड : राधानगरी तालुक्यात डेंग्यूसदृश्य रूग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने त्यावर ग्रामपंचायत व आरोग्य विभागाने त्वरित उपाययोजना म्हणून औषध फवारणी करावी, अशी मागणी होत आहे.
तालुक्यात गेल्या महिन्यात पावसाने चांगली सुरुवात केली होती. गेले पंधरा दिवस ते तीन आठवडे पावसाने ओढ दिल्याने गावातील ठिकठिकाणी रस्ते व नाल्यात साचलेल्या सांडपाण्यामुळे डासांचे प्रमाण वाढले. त्यातून डेंग्यूसदृश्य आजार उद्भवत आहे. याची ग्रामपंचायत व आरोग्य विभागाने त्वरित दखल घेऊन उपाययोजना म्हणून औषध फवारणी करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. डेंग्यूसदृश्य आजार उद्भवत असून, ग्रामपंचायत प्रशासन व आरोग्य विभागाने सतर्कतेने औषध फवारणी करावी, अशी मागणी होत आहे.