शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

कोल्हापूर शहरात १५ ठिकाणी डेंग्यूच्या अळ्या,: चार नवीन रुग्ण, घरोघरी सर्वेक्षण सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 01:03 IST

कोल्हापूर : महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे गुरुवारपासून डेंग्यू सर्वेक्षण मोहीम अधिक व्यापक करण्यात आली. शहराच्या विविध भागांत एकाच दिवसात १ हजाराहून अधिक घरांत महापालिकेची पथके पोहोचली. सुमारे पंधरा घरांतील साठविलेल्या पाण्यात डेंग्यूच्या अळ्या सापडल्याने तेथील पाणीसाठे नष्ट करण्यात आले, तर खासगी रुग्णालयांत आणखी चार नवीन रुग्ण दाखल झाल्याने ही संख्या वाढतच ...

ठळक मुद्देमहापालिकेतर्फे मोहीम, एक हजारहून अधिक घरांची तपासणीही मोहीम ‘डेंग्यूमुक्त कोल्हापूर’ या उद्देशाने राबविण्यात येणार

कोल्हापूर : महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे गुरुवारपासून डेंग्यू सर्वेक्षण मोहीम अधिक व्यापक करण्यात आली. शहराच्या विविध भागांत एकाच दिवसात १ हजाराहून अधिक घरांत महापालिकेची पथके पोहोचली. सुमारे पंधरा घरांतील साठविलेल्या पाण्यात डेंग्यूच्या अळ्या सापडल्याने तेथील पाणीसाठे नष्ट करण्यात आले, तर खासगी रुग्णालयांत आणखी चार नवीन रुग्ण दाखल झाल्याने ही संख्या वाढतच असल्याचे स्पष्ट होत आहे.

महापौर हसिना फरास यांनी दोन दिवसांपूर्वी डेंग्यूच्या उपाययोजनांसंदर्भात बैठक घेऊन महापालिका प्रशासनाला सूचना दिल्यानंतर आरोग्य विभागामार्फत गुरुवारपासून शहरात डेंग्यू सर्वेक्षणाची धडक मोहीम सुरू केली. घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्याकरिता पाच पथके तयार केली असून, या प्रत्येक पथकात वीस कर्मचाºयांचा समावेश आहे.

रुग्णांची तपासणी, घरातील पाणीसाठे तपासणी, परिसराची स्वच्छता आणि आवश्यकता वाटल्यास रक्ताचे नमुने घेणे अशी सर्व कामे या पथकामार्फत एकाच वेळी केली जाणार आहेत. या मोहिमेत पथक नियंत्रण अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, ए.एन.एम., जी.एन.एम. कर्मचारी, ‘आशा’ स्वयंसेविका, कीटकनाशक विभागाकडील कर्मचारी तसेच, आरोग्य स्वच्छता विभागाकडील कर्मचारी यांचा समावेश आहे.

गुरुवारी शहरातील जवाहरनगर, मंगेशकरनगर, भक्तिपूजानगर, शुक्रवार पेठ, जुना बुधवार पेठ, सदर बझार, कनाननगर, टेंबलाई नाका, महाडिक माळ, शिवाजी पेठ व सी.पी.आर. कॅम्पस् हे भाग प्रथम प्राधान्याने व युद्धपातळीवर डेंग्यू सर्वेक्षण मोहिमेकरिता महापालिकेतर्फे हाती घेतले.सुमारे ९५० ते १००० घरांची तपासणी केली. त्यावेळी पंधरा घरांतील पाण्याचा साठा असलेल्या टाक्यांत डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्या. त्यामुळे तत्काळ ते पाणीसाठे रिकामे करण्यात आले.

ही मोहीम ‘डेंग्यूमुक्त कोल्हापूर’ या उद्देशाने राबविण्यात येणार असून, आपल्या भागात येणाºया आरोग्य विभागाकडील अधिकारी व कर्मचाºयांना योग्य ती माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन आरोग्यधिकारी डॉ. अरुण वाडेकर यांनी केले आहे.प्रत्येकाची जबाबदारी ...शहरात डेंग्यूच्या आजारास आळा घालायचा असेल, तर प्रत्येक कुटुंबाने जबाबदारी स्वीकारली पाहिजे. महापालिका प्रशासन प्रयत्न करीत आहेच. तरीही प्रत्येक कुटुंबाने खबरदारी घेतली पाहिजे. डेंग्यूचे डास हे घराभोवतीचे पाणीसाठे, पाण्याची पिंपे, नारळाच्या करवंट्यांतील पाणी यामध्ये अंडी घालतात. प्रत्येक कुटुंबाने आपापल्या घरात तसेच परिसरात लक्ष ठेवून अळ्या उत्पत्तीची ठिकाणे नष्ट करणे आवश्यक आहे.