शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनी भटक्या-विमुक्तांची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2020 17:29 IST

कोल्हापूर : भटक्या-विमुक्त समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी गुुरुवारी भटका समाज मुक्ती आंदोलनतर्फे गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. माजी ...

ठळक मुद्देयशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनी भटक्या-विमुक्तांची निदर्शनेघोषणाबाजी व हलगी-घुमक्याच्या आवाजाने प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन

कोल्हापूर : भटक्या-विमुक्त समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी गुुरुवारी भटका समाज मुक्ती आंदोलनतर्फे गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. माजी उपपंतप्रधान लोकनेते यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून समाजबांधवांनी हे आंदोलन केले. यावेळी घोषणाबाजी व हलगी-घुमक्याच्या आवाजाने परिसर दणाणून गेला.संघटनेचे अध्यक्ष भीमराव साठे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी जोरदार घोषणाबाजी करीत समाजबांधवांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी कार्यकर्त्यांची पारंपरिक वेशभूषा लक्षवेधी ठरली.यानंतर शिष्टमंडळाने जाऊन जिल्हा प्रशासनाकडे निवेदन सादर करण्यात आले. निवेदनातील मागण्या अशा : समाजकल्याण विभागाकडील यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत टोप व पारगाव (ता. हातकणंगले) येथील गोपाळ समाजाच्या वसाहती बांधण्याकरिता दोन वर्षांपूर्वी निर्णय होऊनही अद्याप कार्यवाही झालेली नाही.

भटक्या-विमुक्तांसाठी ते सध्या राहत असलेल्या ठिकाणी त्यांना घर बांधून त्यांचे पुनर्वसन करावे, यासाठी ‘जिथे झोपडी तिथे घर’ अभियान राबविण्यात यावे. नागाव (ता. हातकणंगले) व वसगडे (ता. करवीर) येथील गोपाळ व नंदीवाले समाजाच्या झोपड्या असलेल्या जागेच्या ग्रामपंचायतीत नोंदी घालून त्यावर योजनेतून घर बांधावे असा निर्णय झाला आहे; परंतु त्याची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही.

भटक्या जमातीच्या विकासासाठी असलेल्या वसंतराव नाईक महामंडळाची सर्व थकीत कर्जे माफ करावीत. भटक्या जमातीमधील महिलांसाठी रोजगार उपलब्ध करणारे उपक्रम सुरू करावेत. आंदोलनात जिल्हाध्यक्ष संजय धोंगडे, अमित गायकवाड, युवराज पोवार, आदींसह समाजबांधव सहभागी झाले होते.

 

 

टॅग्स :Morchaमोर्चाcollectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर