शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

आशा कर्मचारी संघटनेची कामगार कायदे रद्द करण्यावरून निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 16:45 IST

आशा व गटप्रवर्तकांच्या वाढीव दोन हजार रुपये मानधनाचा प्रश्न सहा महिन्यांपासून प्रलंबित असल्याबद्दल आशा कर्मचारी संघटनेने जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची भेट घेऊन कैफीयत मांडल्याने तातडीने मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करू, असे आश्वासन त्यांनी दिले. पूरग्रस्त भागात केलेल्या कामाचा मोबदला देण्याच्या बाबतीतही यंत्रणेला सूचित करू, असेही त्यांनी शिष्टमंडळाला सांगितले.

ठळक मुद्देआशांचे वाढीव मानधन मिळण्यासाठी पाठपुरावा करूजिल्हाधिकाऱ्यांचे आशा कर्मचारी संघटनेला आश्वासन

कोल्हापूर : आशा व गटप्रवर्तकांच्या वाढीव दोन हजार रुपये मानधनाचा प्रश्न सहा महिन्यांपासून प्रलंबित असल्याबद्दल आशा कर्मचारी संघटनेने जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची भेट घेऊन कैफीयत मांडल्याने तातडीने मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करू, असे आश्वासन त्यांनी दिले. पूरग्रस्त भागात केलेल्या कामाचा मोबदला देण्याच्या बाबतीतही यंत्रणेला सूचित करू, असेही त्यांनी शिष्टमंडळाला सांगितले.आशा कर्मचारी संघटनेसह जिल्ह्यातील बांधकाम, जनरल, घरेलू कामगार, मेडीकल रिप्रेझेंटेटिव्ह, सायझिंग, साखर कामगार, शालेय पोषण, नगरपरिषद या कर्मचारी संघटनांनी एकत्रितपणे शुक्रवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणांचा निषेध करून ४४ कायदे पूर्ववत करावेत, असा आग्रह धरण्यात आला. निदर्शनानंतर शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची भेट घेतली.

 हा प्रस्ताव नेमका अडकला काठे, हे विचारण्यासाठी नेत्रदीपा पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हा परिषदेत धाव घेतली. मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी प्रस्तावच तयार झाला नसल्याचे सांगितल्याने आशा संतप्त झाल्या.

मित्तल यांनी आरोग्य विभागाला नव्याने प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना देऊन त्यांचा राग शांत केला. या शिष्टमंडळात भरमा कांबळे, शिवाजी मगदूम, दत्तात्रय हरिमाने, मनोहर सुतार, पार्वती जाधव, इम्रान जंगले, सुभाष कांबळे, दिनकर आदमापुरे यांचा समावेश होता. 

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर