शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

भटक्या-विमुक्तांची प्रलंबित मागण्यांसाठी निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2020 11:41 IST

भटक्या जमातीच्या विकासासाठी असलेल्या वसंतराव नाईक महामंडळाची सर्व थकीत कर्जे माफ करावीत. भटक्या जमातीमधील महिलांसाठी रोजगार उपलब्ध करणारे उपक्रम सुरू करावेत. आंदोलनात जिल्हाध्यक्ष संजय धोंगडे, अमित गायकवाड, युवराज पोवार, आदींसह समाजबांधव सहभागी झाले होते.

ठळक मुद्दे यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनी आंदोलन

कोल्हापूर : भटक्या-विमुक्त समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी गुुरुवारी भटका समाज मुक्ती आंदोलनतर्फे गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. माजी उपपंतप्रधान लोकनेते यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून समाजबांधवांनी हे आंदोलन केले. यावेळी घोषणाबाजी व हलगी-घुमक्याच्या आवाजाने परिसर दणाणून गेला.

संघटनेचे अध्यक्ष भीमराव साठे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी जोरदार घोषणाबाजी करीत समाजबांधवांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी कार्यकर्त्यांची पारंपरिक वेशभूषा लक्षवेधी ठरली.

यानंतर शिष्टमंडळाने जाऊन जिल्हा प्रशासनाकडे निवेदन सादर करण्यात आले. निवेदनातील मागण्या अशा : समाजकल्याण विभागाकडील यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत टोप व पारगाव (ता. हातकणंगले) येथील गोपाळ समाजाच्या वसाहती बांधण्याकरिता दोन वर्षांपूर्वी निर्णय होऊनही अद्याप कार्यवाही झालेली नाही. भटक्या-विमुक्तांसाठी ते सध्या राहत असलेल्या ठिकाणी त्यांना घर बांधून त्यांचे पुनर्वसन करावे, यासाठी ‘जिथे झोपडी तिथे घर’ अभियान राबविण्यात यावे.

नागाव (ता. हातकणंगले) व वसगडे (ता. करवीर) येथील गोपाळ व नंदीवाले समाजाच्या झोपड्या असलेल्या जागेच्या ग्रामपंचायतीत नोंदी घालून त्यावर योजनेतून घर बांधावे असा निर्णय झाला आहे; परंतु त्याची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. भटक्या जमातीच्या विकासासाठी असलेल्या वसंतराव नाईक महामंडळाची सर्व थकीत कर्जे माफ करावीत. भटक्या जमातीमधील महिलांसाठी रोजगार उपलब्ध करणारे उपक्रम सुरू करावेत.आंदोलनात जिल्हाध्यक्ष संजय धोंगडे, अमित गायकवाड, युवराज पोवार, आदींसह समाजबांधव सहभागी झाले होते. 

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर