शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
2
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
3
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
4
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
5
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
6
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
7
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
8
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
9
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
10
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
11
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
12
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
13
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
14
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
15
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
16
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
17
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
18
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
19
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
20
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण

लोकशाही भांडवलदारांचे बाहुल

By admin | Updated: December 9, 2014 00:31 IST

अवि पानसरे व्याख्यानमाला

कोल्हापूर : जागतिकीकरणानंतर भांडवलदारांचे राजकीय व्यवस्थेवरील नियंत्रण वाढले आहे़ त्यामुळे लोकशाही भांडवलदारांच्या हातातील बाहुले बनली असून राज्यसंस्थेची धोरणे ही गोरगरीब जनतेपेक्षा भांडवलदारांना पूरक ठरत आहेत़ परिणामी त्यांचा राजकारणातील हस्तक्षेप वाढला आहे़ या पार्श्वभूमीवर लोकशाही प्रबळ करण्यासाठी केवळ निवडणूक म्हणजे लोकशाही हा समज खोडून घटनेतील तत्त्वाप्रमाणे लोकशाहीच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ समीक्षक डॉ़ अरुणा पेंडसे यांनी केले़ श्रमिक प्रतिष्ठानतर्फे येथील शाहू स्मारक भवनात आयोजित कॉम्रेड अवि पानसरे व्याखानमालेत ‘भांडवल व भारतीय लोकशाहीचे भवितव्य’ या विषयावर त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी प्रा़ आशा कुकडे होत्या़ डॉ़ पेंडसे म्हणाल्या, राजकारणी आश्वासने पाळत नाहीत, कारण त्यांचे धोरण भांडवलधार्जिणे असते़ स्वातंत्र्यपूर्व काळापासून ही स्थिती कायम आहे. पण जागतिकीकरणानंतर भांडवलदारांचा राजकीय व्यवस्थेवर दबाव वाढला आहे़ त्यांना सर्वसामान्य जनतेच्या कल्याणापेक्षा आपले हितच महत्त्वाचे वाटत असल्यामुळे त्यांना लोकशाहीशी काही देणे-घेणे नाही़ त्यांना कोणतीही शाही चालते़़़ भले मग ती हुकुमशाहीही असो!़ या प्रक्रियेत मध्यमवर्गालाही कॅप्चर करण्यात भांडवलदार यशस्वी झाले आहेत़ डॉ़ पेंडसे म्हणाल्या, शेतकऱ्यांची कर्जमाफी, जमीन संपादन कायद्याला भांडवलदारांनी विरोध केला़ केंद्रातील सरकार तर भांडवलदारांचे सरकार असल्याप्रमाणे आपली धोरणे राबवित आहे़ गृहनिर्माण, भूसंपादन करताना भांडवलदारांना अनुकुल असेच धोरण राबविले जात असून आदिवासी, गोरगरीब व कामगारांचे हक्क डावलले आहेत़ खनिज उत्खननासाठी तिथल्या आदिवासींना स्थलांतरण करण्यास भाग पाडले जात असून लोकशाहीच्या आडून लोकशाहीच बदलण्याचे हे कारस्थान आहे़ लोकांच्या एकत्रिकरणाची प्रक्रिया रोखण्यासाठी उत्पादनांचे विकेंद्रीकरण करून कामगारांना संघटन करण्यापासून दूर ठेवले जात आहे़ या बाबी डोळसपणे तपासल्या पाहिजेत, असे पेंडसे यांनी सांगितले. सध्या लोकशाही पैशांवर चालत असल्याची खंत व्यक्त करुन प्रा़ कुकडे म्हणाल्या, अदानींनी भाजपला लोकसभा निवडणुकीत प्रचंड पैसा पुरविला़ आता मोदी त्यांचे ऋण फेडत आहेत़ पंतप्रधान मोदी साध्वीच्या ‘अपशब्दा’चे समर्थन करीत आहेत. घटनेतील समाजवाद, धर्मनिरपेक्षता व समतेच्या तत्त्वांच्या प्रचारासाठी लोकचळवळ उभारणे आवश्यक आहे़