निवेदनात, यावर्षी राधानगरी तालुक्यात ढगफुटीसदृश पाऊस पडला आहे. त्यामुळे रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या अंतर्गत अनेक रस्त्यांची चाळण झाली आहे. तालुक्यात यावर्षी बांधकाम समितीचे सभापती पद असल्याने यावर्षी निधीचा दुष्काळ संपणार आहे. जुलै महिन्यात झालेल्या ढगफुटीने जिल्हा परिषद च्या ४७ रस्त्यांचे १९ कोटींचे नुकसान झले आहे. अध्यक्षपद आपल्याकडे व बांधकाम सभापती पदही असल्याने निधी भरघोस स्वरूपात मिळावी, अशी मागणी काँग्रेस आयचे समन्वयक सुशील पाटील-कौलवकर,
भोगावतीचे संचालक धीरज डोंगळे, पंचायत समितीचे सदस्य उत्तम पाटील, रवींद्र पाटील(तारळेकर), ए. डी. चौगले, सुरेश कुसाळे, शहाजी कवडे, राजेंद्र व्हरकड, सुभाष पाटील सिरसे, दिगंबर एरुडकर, इंद्रजित पाटील (बेले), दशरथ पाटील, आर. जी. चरापले, आदींच्या निवेदनावर सह्या आहेत.