शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातील करवीर भूमिअभिलेखमध्ये जमिनीपेक्षा पैसे मोजणी तेजीत

By भीमगोंड देसाई | Updated: February 7, 2024 13:32 IST

महसूल, पालकमंत्र्यांकडे तक्रार : ओळखपत्र नसल्याने दलाल, कर्मचारी कोण संभ्रम

भीमगोंडा देसाईकोल्हापूर : करवीर भूमी उपअधीक्षक कार्यालयात वरकमाईचा दर तेजीत असल्याची तक्रार निखिल पाटील, शशिकांत जाधव, अमोल पाटील, गणेश कुलकर्णी यांनी महसूल, पालकमंत्री, जिल्हाधिकारी, भूमिअभिलेख उपसंचालक यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे. दरम्यान, पत्रातील आरोप, तक्रारीसंबंधी ‘लोकमत’ने मंगळवारी कार्यालयात जाऊन वस्तुस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी ओळखपत्र वापरत नसल्याने कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी आणि दलाल कोण हे कळत नसल्याचे दिसून आले. शेतकऱ्यांना मोजणी, पोटहिश्श्यासाठी प्रचंड हेलपाटे मारावे लागतात, नकाशासाठी मनमानी पद्धतीने पैशाची मागणी करणे, वेळेत नकाशे दिले जात नाहीत, मोजणी अहवाल वेळेत दिले जात नाही, शासकीय कागद असूनही मोजणी अर्जासाठी झेरॉक्स सेंटरकडे पाठवले जाते, असे चित्र दिसले.पत्रात म्हटले आहे, उपअधीक्षकांनी आपल्याच कार्यालयातील कर्मचारी एजंट म्हणून नेमले आहेत. पोट हिस्से, बिगरशेती, गुंठेवारी अशी पैसे मिळवून देणारी कामे हेच कर्मचारी करतात. काही कर्मचारी मोजणी करताना मोजणी अर्जदारास तुझी जमीन जाते, तू चुकीचे मार्किंग केले आहेस, तुझे बिनशेती क्षेत्र कमी बसत आहे, असे सांगून पैशाची मागणी करतात. नवीन मोजणी अर्ज देण्यासाठी आलेल्यास मुख्यालय सहायक मोजणीचे चलन देण्यास विलंब करतात.वेगवेगळ्या त्रुटी काढल्या जातात. लवकर काम करून देण्याचे कारण सांगून दहा हजारांची मागणी करतात. काही दलाल कार्यालयात फिरून नवीन मोजणी अर्जदारांना गाठतात. बाहेरच व्यवहार ठरवून स्वत: मोजणी करून देतात. बिगरशेती मोजणी, कजाप, पोटहिश्श्यासाठी दहा हजार ते दोन लाख रुपयांची मागणी केली जाते. मोजणीचे चलन मंजूर करताना आराखड्यातील सगळेच प्लॉटचे पैसे भरावे लागतील, असे सांगून पैसे उकळतात. कार्यालयातील दोन कर्मचारी प्रकरण ठरवून वसुलीची रक्कम निश्चित करतात. पैसे उकळणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांना महत्त्वाच्या कामकाजाचे टेबल दिले आहे. सूर्यकांत आणि नितीन सुट्टीच्या दिवशी खासगी मोजणी करून शासनाचा महसूल बुडवत असल्याची तक्रार आहे.

कजापचा दर तीन हजारचलन काढताना प्रत्येक प्लॉटला आणि मोजणीस येणाऱ्यास प्रत्येकी १५०० रुपये, तपासणी करणाऱ्यास २ हजार, मुख्य दलाल कुमार कजाप करण्यास प्रत्येक प्लॉटला तीन हजार रुपये मागत असल्याचा आरोप पत्रात केला आहे.

पत्रातील आरोप तथ्यहीन आणि आकसापोटी केले आहेत. दबाव टाकण्यासाठी विघ्नसंतोषी लोकांनी पत्रातून आरोप केले आहेत. कार्यालयात येणाऱ्या प्रत्येकाची तक्रार ऐकून त्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला जातो. - किरण माने, उप अधीक्षक, भूमिअभिलेख, करवीर

टॅग्स :kolhapurकोल्हापूर