रमेश पाटील -कसबा बावडा -दिवाळी लक्ष्मीपूजनासाठी बॅँकात नवीन नोटांना मागणी वाढली आहे. १०, २०, ५०, १०० या नोटांपैकी एक तरी नवीन नोटांचे बंडल आपल्याला मिळावे यासाठी ग्राहकांकडून कॅशियरला गळ घातली जात आहे. कॅशियरही उपलब्ध नोटांच्या बंडलातून नेहमीच्या पण चांगला व्यवहार असणाऱ्या ग्राहकाला एखाददुसरे नवीन बंडल देऊन खूष करण्याचा प्रयत्न करीत आहेत. रिझर्व्ह बॅँकेकडून दिवाळीत बॅँकाना पाठविलेला कॅशचा भरणा हा शक्यतो नवी नोटांचाच असतो. दिवाळी सणाच्या काळात ट्रेझरी शाखांमध्ये नेहमीच नोटांनी भरलेले मोठ-मोठे कंटेनर येत असतात. त्यामुळे दिवाळी काळात सवत्र नवीन नोटा चलनात दिसतात. या नोटा प्रामुख्याने राष्ट्रीयीकृत बॅँकात येत असल्यामुळे त्यांच्याकडून कॅश नेणाऱ्या अन्य इतर सहकारी बॅँका, पतसंस्था व इतर संस्थाही बॅँकांकडे नवीन नोटांची मागणी करत असतात; परंतु सर्वांनाच नवीन नोटा देणे शक्य नसते. जेव्हा बॅँकांतून ग्राहकांकडून मोठी रक्कम काढली जाते, तेव्हा कॅशियर काही जुन्या नोटांची बंडले व एखाददुसरा नवीन नोटांचा बंडल देऊन त्याचे समाधान करण्याचा प्रयत्न करतात. नोटांचे बंडल उपलब्ध नसेल, तर नंतर नोटांचे बंडल देण्याचे आश्वासन देतात. त्याप्रमाणे नंतर त्याची पूर्तता करतात. बॅँकांत नवीन नोटांचा भरणा रिझर्व्ह बॅँकेकडून येऊ लागला आहे. त्यामुळे नोटांचे प्रमाण कमी व नवीन नोटांचे प्रमाण जास्त दिसत आहे, असे जरी असले तरी काही कॅशिअर जुन्या नोटांची बंडले खपविण्याच्या प्रयत्न करीत असताना दिसत आहेत.‘एटीएम’मध्ये नवीन नोटामुळातच एटीएममध्ये नवीन नोटांचा भरणा करावा, असा एक नियम आहे. मात्र, नवीन नोटा उपलब्ध होत नसल्याने एटीएममध्ये कॅश भरणा करणारी एजन्सी जुन्या नोटांचा भरणा करून मोकळी होत असे; परंतु आता दिवाळी सण होईपर्यंत शक्यतो ग्राहकांना नवीनच नोटा मिळतील, अशी शक्यता आहे.
नवीन नोटांना मागणी वाढली
By admin | Updated: October 8, 2014 00:19 IST