कोल्हापूर : जैन श्वेतांबर गुजराती समाज महासंघाच्या राज्य कार्यकारी समिती सदस्यांचे प्रथम राष्ट्रीय महाअधिवेशन रविवारी झाले. यावेळी जैन श्वेतांबर गुजराती समाजाची स्वतंत्र जनगणना करावी, असा ठराव करण्यात आला. राज्यातील विविध भागांतून १२५ पेक्षा जास्त प्रतिनिधी उपस्थित होते.
महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र शाह यांनी समाज संघटनेचे महत्त्व या विषयावर विचार व्यक्त केले. समाजातील प्रश्नावर अनेकांनी मनोगत व्यक्त केले.
केंद्र सरकारने अल्पसंख्याक समुदायाला जाहीर केलेल्या विविध योजनांचा लाभ जैन समाजाला प्राप्त करून देण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडे पाठपुरावा करणे यासह सामाजाचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करण्यासाठीचे ठरावही करण्यात आले. समाजातील परिवारांचे प्रश्न सोडवण्यासाठी गुजराती समाज महासंघ सहायता कक्षाची स्थापनाही करण्यात आली असून हेल्पलाइन नंबर सुरू करण्यात आला. यावेळी धीरज शहा, जयेश शहा, अजय शहा, यश शहा, राजेंद्र शहा, तेजपाल शहा, गिरीश शहा आदी उपस्थित होते.