शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

कुरुंदवाडमधील बेघरांना जागा द्या नगराध्यक्षांकडे मागणी : लालबावटा युनियन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 23:51 IST

कुरुंदवाड : शहरातील बेघर कुटुंबांना राहण्यासाठी जागा मिळावी व त्यासाठी पालिकेने पाठपुरावा करावा; अन्यथा राज्य शेतमजूर लालबावटा युनियनच्यावतीने लाभार्थ्यांच्या कुटुंबासह पालिकेवर मोर्चा काढून बेमुदत कामकाज बंद करण्याचा इशारा निवेदनाद्वारे नगराध्यक्ष जयराम पाटील यांना देण्यात आला.निवेदनात म्हटले आहे की, शहरातील बेघरांना जागा मिळावी, यासाठी संघटनेच्या वतीने यापूर्वी आंदोलने केली होती. या ...

ठळक मुद्देलाभार्थ्यांच्या कुटुंबासह नगरपालिकेवर मोर्चा

कुरुंदवाड : शहरातील बेघर कुटुंबांना राहण्यासाठी जागा मिळावी व त्यासाठी पालिकेने पाठपुरावा करावा; अन्यथा राज्य शेतमजूर लालबावटा युनियनच्यावतीने लाभार्थ्यांच्या कुटुंबासह पालिकेवर मोर्चा काढून बेमुदत कामकाज बंद करण्याचा इशारा निवेदनाद्वारे नगराध्यक्ष जयराम पाटील यांना देण्यात आला.

निवेदनात म्हटले आहे की, शहरातील बेघरांना जागा मिळावी, यासाठी संघटनेच्या वतीने यापूर्वी आंदोलने केली होती. या आंदोलनाची दखल घेत पालिकेने सभागृहाचा ठराव करून प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविला आहे; मात्र त्याचा पाठपुरावा लोकप्रतिनिधींनी केला नसल्याने प्रस्ताव रखडला आहे. या प्रस्तावाचा पाठपुरावा करून बेघरांना जागा मिळवून द्यावे, अन्यथा लाभार्थ्यांच्या मुलांबाळांसह पालिकेवर मोर्चा काढण्यात येईल, असे नमूद करण्यात आले आहे.मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर, उपनगराध्यक्ष अक्षय आलासे, बांधकाम सभापती प्रा. सुनील चव्हाण उपस्थित होते. शिष्टमंडळाचे नेतृत्व लालबावटा शेतमजूर संघटनेचे जिल्हाध्यक्ष भाऊसो कसबे यांनी केले. शिष्टमंडळात अरुण मांजरे, आक्काताई मोहिते, सविता कोथळे, सुषमा साबळे, महादेवी भंडारी, तबसुम शेख, जैथून बागवान, आदी सहभागी झाले होते.क्रीडांगणाची शिवसेनेकडून मागणीकुरुंदवाड : शहराला क्रीडा परंपरा आहे; मात्र, क्रीडांगणच नाही. त्यामुळे खेळाडूंच्या सोयीसाठी पालिकेने क्रीडांगण उभारावे, अशी मागणी शहर शिवसेनेच्या शिष्टमंडळाने नगराध्यक्ष जयराम पाटील व मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर यांना दिले. नगराध्यक्ष पाटील यांनी त्यासाठी जागेचा शोध घेऊन क्रीडांगण उभारण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले.शिष्टमंडळाचे नेतृत्व शिवसेना शहराध्यक्ष राजू आवळे यांनी केले. निवेदनात कुरुंदवाड हे संस्थानकालीन शहर आहे. येथील खेळाडू प्रत्येक खेळात पारंगत असून, आपल्या कामगिरीची चमक सातासमुद्रापार केली आहे. खेळाडूंना खेळाच्या सरावासाठी पालिकेचे तबक उद्यान आहे. मात्र, या मैदानाला सहा महिने तळ्याचे स्वरूप आलेले असते. त्यामुळे विविध खेळांतील खेळाडूंना खेळाचा सराव करता येत नाही.पालिकेची विविध ठिकाणी आरक्षित जागा आहे. या जागांचा शोध घेऊन अद्ययावत क्रीडांगण करण्यात यावे, असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी उपनगराध्यक्ष अक्षय आलासे, बांधकाम सभापती प्रा. सुनील चव्हाण उपस्थित होते.पाठपुरावा नाहीपालिकेने ठराव करून प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविला आहे; मात्र त्याचा पाठपुरावा झाला नसल्याने प्रस्ताव रखडला आहे.