शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

ड्रेनेजलाईनची मागणी आजही कायम

By admin | Updated: March 13, 2015 23:55 IST

नागरिकांमध्ये समाधान : मूलभूत समस्यांची काही प्रमाणात सोडवणूक

चांगले रस्ते, वेळेवर पाणी, कचरा उठाव अन् नगरसेवकांचा दांडगा संपर्क असलेला प्रभाग म्हणजे बापट कॅम्प (क्रमांक १४). असे असले तरी शासकीय अनास्थेमुळे बापट कॅम्प परिसरात ड्रेनेजलाईन नाही. तसेच गेल्या काही वर्षांपासून हा प्रश्न ‘जैसे थे’ पडून राहिला आहे. त्याचबरोबर याच प्रभागात दुसऱ्या भागाला असणाऱ्या मार्केट यार्डच्या पिछाडीस असलेल्या रस्त्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. एकंदरीत, मूलभूत सुविधांबाबत हा प्रभाग समाधानकारक आहे. लोकप्रतिनिधीच्या कामगिरीबाबत देखील समाधानाची भावना नागरिक व्यक्त करू लागले आहेत.या प्रभागात यापूर्वीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये इतर ठिकाणी वास्तव्यास असलेल्यांनी बापट कॅम्प भागाचे प्रतिनिधित्व केले आहे. आजपर्यंत राजेंद्र डकरे, मीनाक्षी काटकर, संगीता काटकर, आदींनी या भागाचे प्रतिनिधित्व केले आहे. २०१० मध्ये कुंभार समाजाने आपलाच प्रतिनिधी उभा केला. या प्रभागात विशेषत: कुंभार समाजाचे सुमारे दीड हजार मतदान आहे. या मतदानाच्या जोरावर प्रकाश कुंभार हे निवडून आले. त्यांनी साडेचार वर्षांत दिलेली आश्वासने पाळून अनेक प्रश्नांची सोडवणूक केली आहे. शहरातील विविध ठिकाणी वास्तव्यास असलेल्या कुंभार समाजाचे एकाच ठिकाणी स्थलांतर केले. त्यामुळे येथील वस्ती नव्याने निर्माण झाली. अद्यापही याठिकाणी महापालिका प्रशासनाने ड्रेनेजलाईन टाकलेली नाही. अजूनही सेफ्टी टँक घरोघरी असून लोकप्रतिनिधी सातत्याने ड्रेनेजसाठी प्रयत्न करीत आहेत. येत्या काही दिवसांत ड्रेनेजलाईन होईल, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करू लागले आहेत.दुसरीकडे, लोणार मळा, लोहार मळा, राजीव गांधी वसाहत हा नागरी वस्तीचा भाग आहे. याठिकाणी मोलमजुरी करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. तरीही, याठिकाणी लोकप्रतिनिधींकडून मूलभूत प्रश्नांची सोडवणूक झाली असून, विकासकामात दुजाभाव केलेला नाही, हे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.उर्वरित सात महिन्यांत प्रभागात प्रलंबित सुमारे ५० लाखांची कामे करणार आहे. त्याचबरोबर ड्रेनेजलाईन टाकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे.- प्रकाश कुंभार-सरवडेकर, नगरसेवक