शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

महिला फौजदाराकडून लाचेची मागणी

By admin | Updated: July 17, 2016 01:01 IST

शाहूवाडी उपअधीक्षक कार्यालयातील प्रकार : कारवाईची चाहूल लागताच कामावर गैरहजर

कोल्हापूर : पाच लाखांची खंडणी मागणाऱ्या सावकाराविरोधात फिर्याद देण्यास गेलेल्या तक्रारदाराकडेच शाहूवाडी पोलिस उपविभागीय कार्यालयातील महिला पोलिस उपनिरीक्षकाने एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लावलेल्या सापळ्याची चाहूल लागताच ही महिला अधिकारी चार दिवस कार्यालयाकडे फिरकलीच नाही. या घटनेनंतर या कार्यालयाकडून जाणीवपूर्वक तक्रारदाराला त्रास दिला जात आहे; तर सावकार पोलिस अधिकाऱ्यांना हाताशी धरून तोडपाणी करीत तक्रारदाराच्या जिवाशी खेळत आहे. अखेर न्याय्य हक्कासाठी झगडणाऱ्या भोई कुटुंबाने पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांचा दरवाजा ठोठावला आहे. जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे देण्यात आलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की विजय शंकर भोई (रा. गुडाळवाडी, ता. राधानगरी) यांनी व्यवसायासाठी खासगी सावकार नामदेव रामचंद्र पाटील (रा. वेतवडे, ता. पन्हाळा) यांच्याकडून दि. १२ नोव्हेंबर २०१४ रोजी चार लाख रुपये वीस टक्के व्याजाने घेतले. त्याबदली त्यांनी कोरा स्टॅम्प, तीन कोरे कागद, तीन ठिकाणी सह्या करून घेतले. त्यानंतर भोई यांनी ३ मे २०१४ रोजी ४ लाख ८० हजार रुपये पाटील यांना परत केले. त्यानंतर तो आणखी पाच लाख रुपयांची मागणी करू लागला. पैसे नसल्याने भोई यांनी त्याला नकार दिला. व्यवसायात अडचणी निर्माण झाल्याने भोई यांनी मंगळवार पेठेतील घर विक्रीसाठी काढले. सावकार पाटील याने या घराचे बनावट संचकारपत्र तयार करून विक्रीवर न्यायालयातून स्थगिती आणली. राधानगरी पोलिस ठाण्यात भोई यांनी पाटीलविरूद्ध फिर्याद दिली. यावेळी नामदेवने राधानगरी पोलिस ठाण्याचा कॉन्स्टेबल रूपेश कुंभार याला मध्यस्थी घातले. यावेळी त्याने पाच लाख आणि एक लाख ७० हजार रुपये न्यायालयाचा खर्च अशी सहा लाख ७० हजार रुपयांची मागणी केली. हे शक्य नसल्याने भोई यांनी दि. ३ मे २०१६ रोजी शाहूवाडी उपविभागीय पोलिस अधीक्षक सूरज गुरव यांच्याकडे तक्रार अर्ज केला. त्यांनी या अर्जाची चौकशी येथील महिला पोलिस उपनिरीक्षकाकडे दिली. तिने तक्रारदार भोई व सावकार पाटील या दोघांना दि. ५ मे २०१६ रोजी समोरासमोर बोलावून चौकशी केली. यावेळी पाटील याने आपले चार लाख मिळाले असून आपण आणखी पाच लाख रुपये मागत असल्याची कबुली दिली. महिला अधिकाऱ्याने भोई यांना बाहेर बोलावून ‘तुला पाच लाख रुपये नामदेवला द्यावे लागले असते, ते आम्ही वाचविले. सगळे प्रकरण आम्ही मिटवितो, त्याबद्दल तुला एक लाख रुपये आम्हाला द्यावे लागतील,’ असे सांगितले. त्यावर भोई हे पैसे त्यांना देण्यास कबूल झाले. तक्रारदार विजय भोई यांच्याकडे शाहूवाडी विभागीय पोलिस उपअधीक्षक कार्यालयातील महिला पोलिस अधिकाऱ्याकडून एक लाख रुपये लाचेची मागणी झाली होती, हे खरे आहे. आम्ही या कार्यालयात सापळा लावला होता. नेमक्या त्याच दिवशी संबंधित महिला पोलिस अधिकारी गैरहजर होती. - सुहास नाडगौंडा, पोलिस उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सातारा.स्वहस्ताक्षरात नमुना लाचेची मागणी करणाऱ्या या महिला पोलिस अधिकाऱ्याने तक्रारदारांना तक्रार मागे घेण्यासाठी स्वत:च्या हस्ताक्षरामध्ये अ‍ॅफिडेव्हिटचा नमुना तयार करून दिला आहे. आपल्याविरोधात तक्रार झाल्याचे समजताच तिने तुमचा मॅटर दिवाणी आहे, असे सांगून चौकशीकामी तो राधानगरी पोलिसांकडे पाठविला. पुढचं बोलून घ्या...‘साहेब’ कोण?‘साहेबांनी पुढचं बोलून घ्यायला सांगितलं आहे. तुमची रक्कम मोठी आहे. त्याबदली एक लाख रुपये साहेबांना द्यावे लागतील. मान्य असेल तर प्रकरण मिटवितो,’ असे ‘त्या’ महिला पोलिस अधिकाऱ्याने भोई यांना सांगितले. हा ‘साहेब’ कोण? चक्क पोलिस मुख्यालयाच्या मागे असलेल्या कार्यालयातून लाचेची मागणी होते. पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांच्या अवतीभोवतीच लाचखोर अधिकारी वावरत असल्याचे या घटनेवरून पुढे आले आहे.सापळ्याची चाहूल लागताच गायबकार्यालयातून बाहेर पडल्यानंतर भोई यांनी पुणे विभागीय लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्याकडे शाहूवाडी पोलिस उपअधीक्षकांसह महिला अधिकाऱ्याविरोधात लेखी तक्रार केली. सरदेशपांडे यांनी साताऱ्याचे पोलिस उपअधीक्षक सुहास नाडगौंडा यांना कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार १० जून २०१६ रोजी नाडगौंडा यांनी शाहूवाडी उपविभागीय पोलिस अधीक्षक कार्यालयावर सापळा रचला. सरकारी पंचासह सात अधिकारी पाळत ठेवून होते. त्यावेळी लाचेची मागणी करणारी महिला पोलिस अधिकारी गैरहजर असल्याचे दिसून आले.