शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

कोल्हापुरात ९९० पशुपक्ष्यांना जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 01:06 IST

संतोष मिठारी ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : नैसर्गिक आणि विविध आपत्तींमध्ये सापडलेल्या लोकांना वाचविण्याबरोबरच ९९० पशुपक्ष्यांना कोल्हापूर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने जीवदान दिले आहे. या दलातील अधिकारी, जवानांनी माणुसकीसह भूतदयाही जपली आहे.कोल्हापूर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे शहरात ताराराणी चौक (नियंत्रण कक्ष), लक्ष्मीपुरी (दलाल मार्केट), कसबा बावडा, टिंबर मार्केट, फुलेवाडी, प्रतिभानगर या ठिकाणी स्टेशन ...

संतोष मिठारी ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : नैसर्गिक आणि विविध आपत्तींमध्ये सापडलेल्या लोकांना वाचविण्याबरोबरच ९९० पशुपक्ष्यांना कोल्हापूर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने जीवदान दिले आहे. या दलातील अधिकारी, जवानांनी माणुसकीसह भूतदयाही जपली आहे.कोल्हापूर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे शहरात ताराराणी चौक (नियंत्रण कक्ष), लक्ष्मीपुरी (दलाल मार्केट), कसबा बावडा, टिंबर मार्केट, फुलेवाडी, प्रतिभानगर या ठिकाणी स्टेशन आहेत. या दलाकडून एकूण १४० अधिकारी आणि जवान कार्यरत आहेत.शहरासह उपनगरांतील कोणत्याही ठिकाणी नैसर्गिक अथवा आग लागणे, आदी स्वरूपांतील आपत्ती निर्माण झाल्याची वर्दी मिळाल्यास त्या ठिकाणी अग्निशमन दल धाव घेऊन मदतकार्य सुरू करते. आपत्ती व्यवस्थापनातील महत्त्वाचा घटक असणाऱ्या या दलाने आपत्तीमध्ये सापडलेल्या केवळ लोकांनाच नव्हे, तर पशुपक्ष्यांना वाचविण्याचे कामही केले आहे. अनेकदा मोठा नळा, खड्डा अथवा अडचणीच्या ठिकाणी सापडलेला हत्ती, गाय, श्वान, माकड, मांजर यांना; तर पतंगासाठी वापरलेल्या जाणाºया मांजा दोºयात, विद्युतवाहिनीमध्ये अडकलेली घार, घुबड, मोर, कोकीळ, कावळा, आदी पक्ष्यांना त्यांनी सुखरूप वाचविले आहे. गेल्या चार वर्षांत या दलाने एकूण ६७० पक्षी, तर ३२० प्राण्यांना जीवदान दिले आहे. या पशुपक्ष्यांना वाचविण्याचे काम करताना त्यांच्याकडून अनेकदा अग्निशमन दलाचे अधिकारी, जवानांना शारीरिक इजा झाली आहे. मात्र, या अधिकारी, जवानांनी आपल्या कर्तव्यामध्ये कसूर केलेली नाही. या कामगिरीची दखल घेऊन या अग्निशमन दलाला सन २०१५ मध्ये ‘किर्लोस्कर वसुंधरा गौरव पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले आहे. पशुपक्ष्यांना जीवदान देण्याची या दलाची कामगिरी आदर्शवत आहे.आकडेवारी दृष्टिक्षेपातसन पक्षी प्राणी२०१४ १८५ ७९२०१५ १५० ८६२०१६ १७५ ८०२०१७ १६० ७५