कोल्हापूर : एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने येथील न्यू पॅलेस येथे शनिवारी जावून शाहू छत्रपती यांना साकडे घातले. एसटी महामंडळ सरकारमध्ये विलीन करावे, यासाठी तुम्ही मदत करावी, अशी मागणीही शिष्टमंडळातर्फे करण्यात आली. यावेळी शिष्टमंडळाने आपल्या आदी. मागण्याचे निवेदन शाहू छत्रपती यांना दिले.जिल्ह्यात १३ दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरू आहे. तरीही सरकार याकडे दूर्लक्ष करीत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. बस वाहतूक बंद असल्याने प्रवाशांचीही मोठी गैरसोय होत आहे. वाड्या, वस्त्यांवरील विद्यार्थ्यांना चालत शाळेला जावे लागत आहे. बस बंद असल्याने खासगी वाहतूकदार मागेल तितके भाडे प्रवाशांना दयावे लागत आहे. यामध्ये प्रवाशांची लूट होत आहे. सामान्य, गरीब प्रवाशांच्या खिशाला अधिक झळ पोहचत आहे.दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांचे शिष्टमंडळ शाहू महाराज छत्रपती यांना भेटले. भेटीत मागणीसंबंधी सविस्तर चर्चा झाली. यावेळी उत्तम पाटील, नामदेव रोडे, विनायक भोगम, कुबेर वासुदेव, प्रमोद चव्हाण, सागर मुधोळकर आदी उपस्थित होते.
एसटी कर्मचाऱ्यांचे शाहू छत्रपती यांच्याकडे साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2021 19:59 IST