शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

स्थगित असणारी ‘कोल्हापूर-मुंबई’ विमानसेवा २८ डिसेंबरपासून पूर्ववत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2019 12:16 IST

तांत्रिक कारणामुळे तात्पुरती स्थगित असलेली ‘कोल्हापूर-मुंबई’ विमानसेवा दि. २८ डिसेंबरपासून पूर्ववत सुरू होणार आहे. ट्रू जेट कंपनीकडून पूर्वीच्या वेळेनुसार ही विमानसेवा पुरविण्यात येणार आहे, अशी माहिती खासदार प्रा. संजय मंडलिक यांनी दिली.

ठळक मुद्देस्थगित असणारी ‘कोल्हापूर-मुंबई’ विमानसेवा २८ डिसेंबरपासून पूर्ववतपूर्वीच्या वेळेनुसार सेवा; आॅनलाईन तिकीट नोंदणी उपलब्ध

कोल्हापूर : तांत्रिक कारणामुळे तात्पुरती स्थगित असलेली ‘कोल्हापूर-मुंबई’ विमानसेवा दि. २८ डिसेंबरपासून पूर्ववत सुरू होणार आहे. ट्रू जेट कंपनीकडून पूर्वीच्या वेळेनुसार ही विमानसेवा पुरविण्यात येणार आहे, अशी माहिती खासदार प्रा. संजय मंडलिक यांनी दिली.या मार्गावरील विमानसेवा स्थगित असल्याने कोल्हापूरमधील उद्योग, व्यवसाय, पर्यटन, आदी क्षेत्रांची मोठी गैरसोय झाली होती. ती दूर करण्यासाठी संबंधित विमानसेवा पूर्ववत सुरू व्हावी; यासाठी दिल्ली येथे सरकार आणि संबंधित कंपनीच्या पातळीवर पाठपुरावा केला. त्याला यश मिळाले असून, ‘कोल्हापूर-मुंबई’ विमानसेवा शनिवार (दि. २८)पासून सुरू केली जाणार असल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे, असे खासदार मंडलिक यांनी सांगितले.

दरम्यान, मुंबई विमानतळावरील धावपट्टीचे काम सुरू असून, त्यामुळे वेळापत्रकाचे पुनर्नियोजन करावे लागणार असल्याने, ट्रू जेट कंपनीने मुंबई-कोल्हापूर विमानसेवा शनिवार (दि. ७) ते शुक्रवार (दि. २७) पर्यंत तात्पुरती स्थगित केली होती. तसेच कंपनीने ही सेवा शनिवार (दि. २८) पासून सुरू करणार असल्याचे त्यावेळी जाहीर केले होते; मात्र, गेल्या आठवड्यात या कंपनीच्या संकेतस्थळावर आॅनलाईन तिकीट नोंदणी उपलब्ध दिसत नसल्याने प्रवाशांमध्ये संभ्रमावस्था असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने बुधवारच्या (दि. १८) अंकात प्रसिद्ध केले होते.

त्यावर या कंपनीने सेवा पूर्ववत सुरू होणार असल्याचे कोल्हापूर विमानतळाच्या संचालकांना कळविले आहे. या कंपनीच्या संकेतस्थळावर शनिवार (दि. २८) पासूनची तिकीट नोंदणी उपलब्ध दिसत असल्याचे पर्यटनतज्ज्ञ बी. व्ही. वराडे यांनी सांगितले.

‘मुंबई-कोल्हापूर’ विमानसेवा शनिवार (दि. २८)पासून पुन्हा सुरू करण्यात येईल, असे ट्रू जेट कंपनीचे कोल्हापुरातील व्यवस्थापक बी. रणजितकुमार यांनी शुक्रवारी कळविले आहे. पूर्वीप्रमाणे मंगळवार, बुधवार, गुरुवार, शनिवार आणि रविवार अशी आठवड्यातील पाच दिवस सेवा पुरविण्यात येणार आहे.- कमलकुमार कटारिया, संचालक, विमानतळ

विमानसेवेची वेळ

  •  मुंबईतून निघणार : दुपारी १२ वाजून ४५ मिनिटांनी
  • कोल्हापूरमध्ये येणार : १ वाजून ५० मिनिटांनी
  • कोल्हापुरातून निघणार : २ वाजून १० मिनिटांनी
  •  मुंबईत पोहोचणार : ३ वाजून २० मिनिटांनी

 

 

टॅग्स :Airportविमानतळkolhapurकोल्हापूर