शहरं
Join us  
Trending Stories
1
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
2
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
3
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
4
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
5
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
6
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
7
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
8
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
9
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
10
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
11
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
12
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
13
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
14
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
15
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
16
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
17
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
18
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
19
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
20
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट

महायुतीचे संभाव्य उमेदवार निश्चित

By admin | Updated: August 27, 2014 00:17 IST

विधानसभेचे राजकारण : ‘स्वाभिमानी’च्या भूमिकेला महत्त्व

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघांतील महायुतीचे संभाव्य उमेदवार जवळपास निश्चित झाल्याचे मानण्यात येते. शिवसेना स्वाभिमानी संघटनेला दोनच जागा देण्यावर ठाम राहिली तरच वेगळे काही घडू शकते, परंतु सध्या तरी त्यांनी ‘स्वाभिमानी’च्या दोन जागा गृहीत धरून उमेदवारांची निश्चिती केल्याचे दिसत आहे.दहापैकी आता शिवसेनेकडे आठ जागा आहेत व भाजपकडे दोन जागा आहेत, परंतु लोकसभा निवडणुकीत या दोन्ही पक्षांशिवाय स्वाभिमानी शेतकरी संघटना, रिपब्लिकन पक्षाचा आठवले गट आणि महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष अशा पाच पक्षांची महायुती झाली. त्यातील रासपचे जिल्ह्यात अस्तित्व नाही. आठवले गट सक्रिय आहे, परंतु त्यांना उमेदवारी देण्याचा विचारच केलेला नाही. ‘स्वाभिमानी’ची दहापैकी कोल्हापूर उत्तर वगळता नऊ मतदारसंघांत ताकद आहे, परंतु त्यांना शिवसेना दोनपेक्षा जास्त जागा द्यायला आतातरी तयार नाही. त्यावरून या दोन पक्षांत तणातणी सुरू आहे, परंतु त्याची फारशी दखल न घेता शिवसेनेने त्यांच्या वाट्याला येणाऱ्या उमेदवारांची निश्चिती केल्याचे दिसत आहे.शिवसेनेचे सध्या जिल्ह्यात राजेश क्षीरसागर, चंद्रदीप नरके व डॉ. सुजित मिणचेकर हे आमदार आहेत. विद्यमान आमदारांना बदलण्यासारखी स्थिती नाही व तसे फारसे प्रबळ कारणही नाही. कोल्हापूर उत्तरमध्ये आमदार क्षीरसागर व जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्यात उमेदवारीसाठी रस्सीखेच आहेच, परंतु त्यामुळे उमेदवार बदलला जाईल असे म्हणणे धाडसाचे ठरेल. उर्वरित सहापैकी कागलमधून संजय घाटगे व शाहूवाडीतून सत्यजित पाटील यांचीही उमेदवारी अप्रत्यक्षपणे जाहीरच केली आहे. सत्यजित पाटील यांना तर त्यांनी विजयी मिरवणुकीला येतो, असे सांगून निवडणुकीच्या कामाला लागा, असेच स्पष्ट केले आहे. राधानगरीतून प्रकाश आबिटकर यांचा शिवसेना प्रवेश झाला आहे. त्यांच्या उमेदवारीबाबत थेट घोषणा झालेली नसली, तरी उमेदवारीबाबत काहीतरी निश्चित ‘कमिटमेंट’ झाली असल्याशिवाय ते शिवसेनेत जाण्याचे धाडस करणार नाहीत. आबिटकर यांनीही लढायचे पक्के करून तयारी सुरू केली आहे. ‘स्वाभिमानी’ची शिवसेनेबरोबर रस्सीखेच झालीच तर शाहूवाडी व राधानगरी या मतदारसंघांबाबतच होऊ शकते, परंतु शिवसेना त्याबाबत कितपत लवचिक राहते यावर या घडामोडी अवलंबून असतील. (प्रतिनिधी)