शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

संध्यामठला हरवून प्रॅक्टिस (अ)ची आगेकूच

By admin | Updated: May 26, 2017 01:03 IST

फुटबॉल महासंग्राम : १७ वर्षांखालील गटात प्रॅक्टिस, गडहिंग्लज, खंडोबाची प्रतिस्पर्ध्यांवर मात; नितांत कोराणेचे ४ गोल

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : सॉकर अमॅच्युअर इन्स्टिट्यूट (साई)तर्फे रामभाऊ चव्हाण यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेल्या ‘फुटबॉल महासंग्राम’ स्पर्धेत गुरुवारी प्रॅक्टिस क्लब (अ)ने संध्यामठ तरुण मंडळाविरुद्धचा सामना १-०ने जिंकला; तर १७ वर्षांखालील गटात प्रॅक्टिस क्लब, गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल संघ, खंडोबा तालीम मंडळाने प्रतिस्पर्ध्यांवर मात करीत आगेकूच केली. शाहू स्टेडियम येथे दुपारच्या सत्रात पीटीएम (ब) व प्रॅक्टिस क्लब यांच्यात झाला. या सामन्यात ‘पीटीएम’कडून रोहित देवणे, जय हंचनाळे, हृषिकेश ढेरे, फयीम शेख यांनी, तर ‘प्रॅक्टिस’कडून सिद्धेश ढोबळे, ओम पोवार, सिद्धेश पाडळकर यांनी चांगला खेळ केला. संपूर्ण वेळेत सामना गोलशून्य बरोबरीत राहिल्याने सामन्याचा निकाल टायब्रेकरवर घेण्यात आला. यात प्रॅक्टिसने २-१ने विजय मिळविला. दुसऱ्या सामन्यात गडहिंग्लज युनायटेड संघाने बालगोपाल तालीम मंडळावर २-० अशी मात केली. यात गडहिंग्लजकडून सहाव्या मिनिटास ओंकार पाटीलने, तर २२ व्या मिनिटास सागर पोवारने गोल केला. ‘बालगोपाल’कडून रणजित पोवार, सिद्धेश पिसे, सिद्धांत पाटील, प्रथमेश पाटील यांनी, तर ‘गडहिंग्लज’कडून ओंकार वेलगुडकर, सुलतान शेख, ओंकार पाटील, रोहित साळोखे यांनी चांगला खेळ केला. तिसऱ्या सामन्यात खंडोबा तालीम मंडळाने उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम संघावर ५-० अशी एकतर्फी मात केली. यात ‘खंडोबा’कडून नितांत कोराणे याने ४, तर कुणाल चव्हाण याने एक गोल नोंदविला. ‘उत्तरेश्वर’कडून शोएब बागवान, रोहित सुतार, साई माने, अनिकेत माने यांनी, तर ‘खंडोबा’कडून आदित्य भागलेकर, ओंकार रायकर, प्रणव घाटगे यांनी उत्कृष्ट खेळ केला. विद्युतझोतात रात्री आठ वाजता वरिष्ठ गटात प्रॅक्टिस क्लब (अ) व संध्यामठ तरुण मंडळ यांच्यात सामना झाला. सामन्याच्या प्रारंभापासून प्रॅक्टिसचे वर्चस्व राहिले. यात राहुल पाटील, सागर चिले, सुशांत अतिग्रे यांनी, तर संध्यामठकडून अजिंक्य गुजर, आशिष पाटील, रोहित पौंडकर यांनी आक्रमक व वेगवान खेळाचे प्रदर्शन केले. १७व्या मिनिटास प्र्रॅक्टिसकडून सागर चिलेने गोलरक्षक पुढे आल्याची संधी साधत गोल नोंदवीत संघास १-० अशी आघाडी मिळवून दिली. हीच गोलसंख्या कायम राखत सामनाही ‘प्रॅक्टिस’ने जिंकला.आजचे सामने १७ वर्षांखालील गटातील सामने दु. ३.३० वा. : संध्यामठ तरुण मंडळ विरुद्ध करवीर फुटबॉल संघसायं. ५.०० वा. शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध साईनाथ स्पोर्टससायं. ६.३० वा. पीटीएम विरुद्ध जुना बुधवार तालीम मंडळ वरिष्ठ गट सामना रात्री : ८ वा. गडहिंग्लज युनायटेड विरुद्ध बालगोपाल तालीम मंडळ