शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

उत्कंठावर्धक लढतीत ‘दिलबहार’ची ‘पाटाकडील’वर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2020 15:43 IST

महापौर चषक फुटबॉल स्पर्धेत उत्कंठावर्धक सामन्यात दिलबहार तालीम मंडळ ‘अ’ने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाटाकडील तालीम मंडळ ‘अ’चा टायब्रेकरवर पराभव करून स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली.

ठळक मुद्देउत्कंठावर्धक लढतीत ‘दिलबहार’ची ‘पाटाकडील’वर मातमहापौर चषक फुटबॉल स्पर्धा; प्रमोद पांडे ठरला उत्कृष्ट

कोल्हापूर : महापौर चषक फुटबॉल स्पर्धेत उत्कंठावर्धक सामन्यात दिलबहार तालीम मंडळ ‘अ’ने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाटाकडील तालीम मंडळ ‘अ’चा टायब्रेकरवर पराभव करून स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली.छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या या स्पर्धेत मंगळवारी या दोन पारंपरिक संघांत उपांत्यपूर्व लढत झाली. सामन्याच्या सुरुवातीला ‘पाटाकडील’कडून हृषिकेश मेथे-पाटीलने केलेली चढाई ‘दिलबहार’च्या गोलरक्षकाने परतवली. त्यानंतर ‘दिलबहार’कडून पवन माळीने दिलेल्या पासवर रोमॅरिकची गोल करण्याची संधी वाया गेली. ‘पाटाकडील’कडून ओंकार पाटील, प्रथमेश हेरेकर, रियान यादगीर यांनी सामन्यात आघाडी घेण्यासाठी अनेक चाली केल्या. मात्र, पूर्वार्धात त्यांना यश आले नाही.उत्तरार्धात दोन्ही संघ आघाडी घेण्याच्या इराद्याने मैदानात उतरले. त्यात ‘दिलबहार’कडून राहुल तळेकर, सणी सणगर, रोहन दाभोळकर, प्रमोद पांडे यांनी अनेक चढाया केल्या. त्या सर्व ‘पाटाकडील’च्या सजग गोलरक्षकाने परतावून लावल्या. अखेरच्या काही क्षणांत दोन्ही संघांनी तोडीस तोड खेळ करीत फुटबॉलप्रेमींकडून वाहवा मिळविली.

अखेरपर्यंत सामना गोलशून्य बरोबरीत राहिल्याने मुख्य पंच सुनील पोवार यांनी सामन्याचा निकाल टायब्रेकरवर घेतला. त्यात ‘दिलबहार’कडून सनी सणगर, प्रमोद पांडे, मसूद मुल्ला, अनिकेत जाधव, रोमॅरिक यांनी गोल केले; तर ‘पाटाकडील’कडून प्रथमेश हेरेकर, अक्षय मेथे-पाटील यांचेच गोल झाले. त्यामुळे हा सामना ‘दिलबहार’ने ५-२ असा जिंकत स्पर्धेची उपांत्य फेरीत गाठली.सोमवारी (दि. ९) झालेल्या उपांत्यपूर्व लढतीत बालगोपाल तालीम मंडळाने तुल्यबळ शिवाजी तरुण मंडळाचा टायब्रेकरवर ४-२ असा पराभव केला. या सामन्यात ‘शिवाजी’कडून २६व्या मिनिटाला संकेत साळोखेने गोलची नोंद केली होती; तर ‘बालगोपाल’कडून व उत्तरार्धात अभिनव देशमुख याने ५१व्या मिनिटास गोल करीत १-१ अशी बरोबरी साधली.

त्यामुळे हा सामन्याचा निकाल टायब्रेकरवर घेण्यात आला. त्यात ‘बालगोपाल’कडून प्रतीक पोवार, रोहित कुरणे, आशिष कुरणे, ऋतुराज पाटील यांनी गोल केले; तर ‘शिवाजी’कडून रणवीर जाधव, ओला यांनाच गोल करता आले. त्यामुळे हा सामना बालगोपाल संघाने ४-२ असा जिंकत स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली.उत्कृष्ट खेळाडू - प्रमोद पांडे

 

 

टॅग्स :Footballफुटबॉलkolhapurकोल्हापूर