शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

'शिवतीर्था'च्या तिपटीने दसरा मेळावा घेणार - दीपक केसरकर

By संदीप आडनाईक | Updated: September 25, 2022 18:51 IST

Deepak Kesarkar : कोल्हापूरचे पालकमंत्री म्हणून घोषणा होताच दीपक केसरकर यांनी सकाळी अंबाबाईचे दर्शन घेतले. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

कोल्हापूर : शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी ज्यांनी प्रथम अर्ज केला त्यांना प्रथम परवानगी मिळाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठरविले असते तर हा मेळावा होऊ दिला नसता. मात्र, मुख्यमंत्री जनतेचा आहे, त्यामुळे त्यांनी न्यायालयाचा आदर राखला आहे. या मेळाव्याच्या तिपटीने आम्हीही दसरा मेळावा घेउ, आणि बाळासाहेबांच्या ज्वलंत हिंदुत्वाच्या विचारांचे सोने लुटू, असे शालेय शिक्षणमंत्री आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी रविवारी कोल्हापुरात सांगितले.

कोल्हापूरचे पालकमंत्री म्हणून घोषणा होताच दीपक केसरकर यांनी सकाळी अंबाबाईचे दर्शन घेतले. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. दसरा मेळाव्यातून बाळासाहेबांचे विचार पुन्हा जागृत करु असे त्यांनी सांगितले. देवीचे मनापासून पूजन करायचे असते. देव शेवटी भक्तीचा भुकेला असतो, यात राजकारण आणायचे नाही, असे सांगून आम्हीही शांततेत दसरा मेळावा घेणार आहोत आणि कोणालाही चिडविण्यासाठी हा मेळावा नसेल असे स्पष्ट केले. केसरकर म्हणाले, दसरा हा विचाराचे सोने लुटायचा दिवस असतो. जे विचार बाळासाहेब देत असत, त्या विचारांशी आम्ही प्रामाणिक आहोत. त्यांच्या हिंदुत्वाच्या विचाराबरोबर आम्ही राहू, यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीला स्थान नसेल.

बाळासाहेबांचे विचार प्रखर हिंदुत्ववादी होते. त्यांच्यामुळेच वैष्णोदेवी आणि अमरनाथसारख्या यात्रा सुरळीत पार पडल्या. आजसुध्दा वैष्णोदेवीला ज्योत प्रज्वलित करण्याचा मान आमच्यासोबत असलेल्या खासदारांना आहे. देवीचे आणि बाळासाहेबांचे आशिर्वाद आमच्यासोबत आहेत. म्हणून शिवसेनेचा मूळ विचार सोबत घेउन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे जात आहेत. आम्ही त्यांच्यासोबत आहोत, असे दीपक केसरकर म्हणाले.

... त्या मेळाव्यात सहभागी होण्याचा निर्णय मुख्यमंत्री घेणारशिवतीर्थावरील दसरा मेळाव्यास जाण्याचा आग्रह आमच्यासोबत असलेले कांही शिवसैनिक घेत आहेत. मात्र त्या गटाच्या मेळाव्याला जायचे की नाही, याचा अंतिम निर्णय एकनाथ शिंदे घेतील. मुख्यमंत्र्यांनी जर ठरविले असते तर शिवतीर्थावर आमचाच मेळावा झाला असता, मात्र आम्ही न्यायालयाचा आदर केला आहे. याउलट त्यांनी काल केलेला जल्लोष पाहता कायदा व सुव्यवस्था राखून हा मेळावा घेण्याची अट धुडकावून लावलेली दिसते, असे केसरकर म्हणाले.

टॅग्स :Deepak Kesarkarदीपक केसरकर