कळंबा : कळंबा तलावातील पाणीपातळी घटल्याने पात्रातील ऐतिहासिक शाहू कालीन विहीर ऐन मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात उघडी पडली आहे. त्यामुळे पाणीटंचाईच्या झळा तीव्र होण्याची शक्यता आहे. कळंबा तलावातील पाणीसाठा खालावला आणि पाणीपातळी दहा फुटांखाली गेली तर ग्रामस्थ व जनावरे यांची पाण्याविना परवड होऊ नये यासाठी तलावपात्रात विहीर खोदण्यात आली होती. पाच वर्षांपूर्वी जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत विहिरीतील गाळ काढण्यात आला होता.
अंदाजे पंचाहत्तर फूट खोल पन्नास फूट व्यासाची विहीर कोरडा दुष्काळ पडला तरी नवसंजीवनी ठरते. यंदा ऐन उन्हाळ्यात मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तलावात निव्वळ अकरा फूट पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. दहा फूट पाणीसाठा राहिला तर पाणीउपसा बंद करावा लागतो. तलावातील दहा फूट पाणीसाठा अर्थात मृत डेड वॉटर तलावातील जलचरांच्या अस्तित्वासाठी कायम ठेवावा लागतो. त्यामुळे कळंबा, पाचगाव ग्रामपंचायत आणि पालिका प्रशासनाने पाणीउपसाचे नियोजन करणे गरजेचे आहे.
फोटो : ०६ कळंबा तलाव
मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कळंबा तलावातील पाणीपातळी घटल्याने ऐतिहासिक शाहू कालीन विहीर उघडी पडली आहे.