शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

दोन हजार, पाचशेच्या नोटांवरील लिखाणात घट

By admin | Updated: March 1, 2017 00:45 IST

न चालण्याचा धसका : रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाच्या आदेशाच्या अंमलबजावणीचा परिणाम

रमेश पाटील --कसबा बावडा --चलनी नोटांवर लिखाण करण्यास रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाने जरी बंधने घातली असली, तरी अनेकांकडून नोटांवर लिखाण करण्यात येतच होते. मात्र, याला नुकत्याच नवीन चलनात आलेल्या पाचशे व दोन हजारांच्या नोटा अपवाद ठरल्या आहेत. कारण नवीन नोटांवर जर काही लिहिलेले असल्यास अशा नोटा स्वीकारल्या जाणार नाहीत, असे फलकच पेट्रोल पंप, मॉल व काही दुकानांमध्ये झळकू लागल्यामुळे या सर्वांचा परिणाम म्हणून आजच्या घडीलाही नवीन पाचशे व हजारांच्या नोटा ‘क्लिन’ दिसत आहेत.या नवीन नोटा चलनात येण्यापूर्वी नोटांवर लिखाण करण्यात बँकांचे कॅशिअर आघाडीवर असत. जलद हिशोब करता यावा व वारंवार मोजायचा त्रास होऊ नये, यासाठी नोटांवर लिखाण करण्यात येत होते. नोटांवर लिखाण केल्याने त्या लवकर खराब होतात. त्यामुळे नोटांवर लिहिण्यास बंदी घालण्यात आली होती. १ जानेवारी २०१४ पासून बँकांनी लिखाण केलेल्या नोटा स्वीकारू नयेत, असे आदेश काढण्यात आले होते. मात्र, या आदेशाची अंमलबजावणी होत नव्हती.बँकांचे कॅशिअरही स्वत: नोटांवर लिहीत असल्याने त्यांनी लिहिलेल्या नोटाही स्वीकारण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे नोटांवर लिहिण्याचे कोणाकडूनही बंद झालेले नव्हते. कॅशिअरला १०० नोटांचे बंडल तयार करण्यासाठी नोटांवर वारंवार लिहावे लागत होते. ही पद्धत तशीच पुढे चालू होती. आता मात्र परिस्थिती बदलली. जेव्हा जुन्या पाचशे व एक हजाराच्या नोटा चलनातून बाद करून नवीन पाचशे व दोन हजाराच्या नोटा चलनात प्रथम आल्यावर अशा नोटांवर लिहिण्यास रिझर्व्ह बँकेने बंदी घातली. याचा परिणाम मात्र लगेचच दिसू लागला. जो-तो अशा नोटा घेताना पारखून व त्यावर काही लिहिलेले तर नाही ना, ते तपासून पाहू लागला. त्यामुळे नोटांवर काही लिहिण्याचे धाडस कोणाकडून झाले नाही.सध्या अनेक पेट्रोलपंपावर नवीन नोटावर लिखाण केलेले असल्यास अशा नोटा स्वीकारल्या जाणार नाहीत, असे फलकच लावले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये जागृती झाली आहे. काही मॉलमध्येही नवीन नोटांवर जर काही लिहिलेले असल्यास अशा नोटा परत केल्या जात आहेत. लहान-मोठ्या दुकानातही लिहिलेल्या नोटा स्वीकारल्या जात नाहीत.‘एटीएम’मधील नोटासध्या एटीएममधून ५०० व २००० च्या नवीन नोटा बाहेर येत आहेत. अशा नोटेवर कुठेही काहीही लिहिलेले नसते. तरीही ग्राहक अशा नोटासुद्धा तपासून घेताना दिसत आहेत. एकंदरीत नवीन नोटा सध्यातरी ‘क्लिन’ आहेत. लिहिलेली नोट मिळाली तर परतमुळात नवीन ५०० व २००० च्या नोटा स्वीकारताना त्या पारखून, तपासून खरेदी करताना घेतल्या जातात. दोन हजाराची नोट जर एखाद्याने दिली, तर त्याचा मोबाईल नंबर व नोटेचा नंबर लिहून घेतला जातो. चुकून लिहिलेली नोट आली आणि नंतर समजले तर संबंधित ग्राहकाला फोन करून ती परत केली जाते. त्यामुळे नवीन नोटांची बऱ्यापैकी काळजी घेताना लोक दिसत आहेत.