शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

आजरा दंगलीतील गुन्हे मागे घेणार : मुंबईतील बैठकीत निर्णय, प्रकाश आबिटकर यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 01:18 IST

कोल्हापूर : आजऱ्यात दहा वर्षांपूर्वी झालेल्या दंगलप्रकरणी हिंदू-मुस्लिम समाजातील ७४ जणांविरोधात दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचा निर्णय मुंबई येथे गुरुवारी झालेल्या या संदर्भातील

कोल्हापूर : आजऱ्यात दहा वर्षांपूर्वी झालेल्या दंगलप्रकरणी हिंदू-मुस्लिम समाजातील ७४ जणांविरोधात दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचा निर्णय मुंबई येथे गुरुवारी झालेल्या या संदर्भातील समितीच्या बैठकीत झाला. आमदार प्रकाश आबिटकर यांनी या प्रकरणी सातत्याने पाठपुरावा केला होता. वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या दालनामध्ये झालेल्या या समितीच्या बैठकीला गृहराज्यमंत्री दीपक केसरकर आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे उपस्थित होते.

चायनीज गाड्यावरील भांडणानंतर २००८ मध्ये आजऱ्यामध्ये दंगल घडली होती. त्यानंतर पाच दिवसांचा कर्फ्यू लावला गेला. दोन्ही समाजांतील ७४ जणांवर दोन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले होते.या सर्वांवरील गुन्हे मागे घ्यावेत यासाठी आमदार प्रकाश आबिटकर यांनी प्रयत्न सुरू केले होते; परंतु जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील याबाबतच्या समितीने दोन वेळा हा प्रस्ताव अपात्र ठरविला होता. 

आबिटकर यांनी बदलत्या परिस्थितीमध्ये दोन्ही समाजांच्या युवकांच्या करिअरचा प्रश्न, तणाव निवळल्याच्या परिस्थितीची मांडणी करून राज्यस्तरीय समितीकडे हे गुन्हे काढून घेण्यासाठी पाठपुरावा सुरू होता. अशा पद्धतीचे गुन्हे मागे घेण्याबाबत १२ आॅगस्ट २०१६ रोजी झालेल्या शासन आदेशाचा संदर्भ घेत अनवधानाने झालेल्या या घटनेतील संबंधितांवरील गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी आबिटकर यांनी केसरकर यांच्याकडे केली होती.‘लोकमत’ने मांडला विषयदोन्ही समाजांच्या ७४ जणांवर गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये युवकांचे प्रमाण मोठे आहे. यातील अनेकांना नोकºयांमध्ये अडचण निर्माण झाली. अनेकांना पासपोर्टही मिळाले नाहीत. यामुळे हे सर्वजण अक्षरश: हवालदिल झाले होते. याबाबत 30 नोव्हेंबर २०१७ रोजी ‘लोकमत’ने विशेष वृत्त प्रकाशित केले होते. याची दखल घेत आमदार आबिटकर यांनी ३ डिसेंबर रोजी दोन्ही समाजांच्या प्रमुखांची आजरा येथे बैठक घेतली होती. या बैठकीतही अनेकांनी ‘लोकमत’ला धन्यवाद दिले होते.आजऱ्यामध्ये अनवधानाने घडलेल्या या प्रकारामध्ये अनेक युवक, नागरिक अडकले होते. गुन्हे दाखल झाल्याने नऊ वर्षे न्यायालयीन लढा सुरू होता. मात्र, अनेकांच्या रोजगारामध्ये, नोकºयांमध्ये, पासपोर्ट मिळविण्यामध्ये गुन्हे दाखल झाल्याने अडचणी निर्माण होत होत्या. याप्रकरणी फारशी चर्चा न करता हे गुन्हे मागे घेतले जावेत यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू ठेवले होते. गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी या कामी महत्त्वाची भूमिका बजावली आणि अखेर माझ्या या प्रयत्नांना मोठे यश मिळाले. - प्रकाश आबिटकर, आमदार