शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

उच्चाधिकार समिती बैठकीनंतर ‘सर्किट बेंच’ बाबत निर्णय, बार असोसिएशनचे धोरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 11:31 IST

कोल्हापूर सर्किट बेंचप्रश्नी आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी घेण्यात आलेली बैठक स्थगित करण्यात आली. ही बैठक पुन्हा १२ मार्चला घेण्याचा निर्णय मंगळवारच्या बैठकीत येथे घेण्यात आला.

ठळक मुद्देउच्चाधिकार समिती बैठकीनंतर ‘सर्किट बेंच’ बाबत निर्णयबार असोसिएशनचे धोरण : दिशा ठरविण्यासाठी मंगळवारी पुन्हा बैठक

कोल्हापूर : कोल्हापूर सर्किट बेंचप्रश्नी आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी घेण्यात आलेली बैठक स्थगित करण्यात आली. ही बैठक पुन्हा १२ मार्चला घेण्याचा निर्णय मंगळवारच्या बैठकीत येथे घेण्यात आला.कोल्हापूर सर्किट बेंचप्रश्नी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश नरेश पाटील यांची खंडपीठ कृती समितीच्या शिष्टमंडळाने २६ फेब्रुवारीला मुंबईत भेट घेतली. या बैठकीतील माहिती व आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनने न्यायसंकुलामधील राजर्षी शाहू छत्रपती सभागृहात मंगळवारी दुपारी बैठक बोलाविण्यात आली होती.बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रशांत चिटणीस यांनी, मुंबईतील बैठकीचा वृत्तान्त सांगितला. सहा जिल्ह्यांतील वकिलांनी नरेश पाटील यांची भेट घेतली. त्यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार ते सर्किट बेंच देण्यास अनुत्सुक असल्याचे दिसते. त्यामुळे आपल्याला आंदोलनाशिवाय पर्याय नाही.

रविवारी (दि. १०) उच्चाधिकार समितीची मुंबईत बैठक होणार आहे. या बैठकीत उच्च न्यायालय, औरंगाबाद व नागपूर खंडपीठ आणि गोवा न्यायालयाचे न्यायाधीश उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत कोल्हापूर सर्किट बेंचबाबत काय निर्णय होतो, तो पाहूया; त्यानंतर १२ मार्चला बैठक बोलाविण्यात येईल. त्यामध्ये आंदोलनाची दिशा ठरेल. या बैठकीनंतर सहा जिल्ह्यांची खंडपीठ कृती समितीची बैठक बोलाविण्यात येणार आहे. तत्पूर्वी, मी आज, बुधवारी नागपूर येथे न्यायाधीश यांच्या भेटीसाठी जाणार आहे.यावेळी अ‍ॅड. महादेवराव आडगुळे म्हणाले, उच्चाधिकार समितीची बैठक होऊ दे. त्यानंतर याबाबत निर्णय घेऊ. त्यामुळे आजची बैठक स्थगित करा. यावेळी अ‍ॅड. अशोक पाटील, अ‍ॅड. सर्जेराव खोत, आदींनी मते व्यक्त केली.

बैठकीस अ‍ॅड. शिवाजीराव राणे, अ‍ॅड. विवेक घाटगे, अ‍ॅड. प्रकाश मोरे, अ‍ॅड. विजय महाजन, अ‍ॅड. विजय पाटील, अ‍ॅड. विलासराव दळवी,अ‍ॅड. दीपाली पोवार, अ‍ॅड. ओंकार देशपांडे, अ‍ॅड. स्वाती तानवडे यांच्यासह वकील उपस्थित होते. सेक्रेटरी सुशांत गुडाळकर यांनी स्वागत केले. अ‍ॅड. तेहजीज नदाफ यांनी आभार मानले. 

 

टॅग्स :Courtन्यायालयkolhapurकोल्हापूर