शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

अधिवेशन काळात निर्णय घ्या, अन्यथा तीव्र संघर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2021 12:02 IST

Mahavitran Kolhapur- राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरू आहे, या काळातच वीज बिल माफीचा निर्णय घ्या, अन्यथा जनतेचा उद्रेक बघा, असा इशारा इरिगेशन फेडरेशनने महावितरणला दिला. लॉकडाऊन काळातील सहा महिन्यांची वीज बिले कोणत्याही परिस्थितीत भरणार नाही, याचा पुनरुच्चार करत ऑक्टोबरनंतरची बिले द्या, लगेच भरतो अशी ऑफरही महावितरणला दिली.

ठळक मुद्देइरिगेशन फेडरेशनचा महावितरणला इशाराऑक्टोबरनंतरची बिले द्या, भरायला तयार

कोल्हापूर : राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरू आहे, या काळातच वीज बिल माफीचा निर्णय घ्या, अन्यथा जनतेचा उद्रेक बघा, असा इशारा इरिगेशन फेडरेशनने महावितरणला दिला. लॉकडाऊन काळातील सहा महिन्यांची वीज बिले कोणत्याही परिस्थितीत भरणार नाही, याचा पुनरुच्चार करत ऑक्टोबरनंतरची बिले द्या, लगेच भरतो अशी ऑफरही महावितरणला दिली.विक्रांत पाटील किणीकर, बाबासाहेब पाटील भुयेकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने महावितरणचे अधीक्षक अभियंता अंकुर कावळे यांची भेट घेऊन वसुली मोहीम थांबवा, अशी विनंती करत ऑक्टोबरनंतरची बिले देण्याची ऑफर दिली. यासंदर्भात वारंवार शांततेने गाऱ्हाणे मांडून देखील सरकार लक्ष देत नसल्याने जनतेमध्ये संतापाची लाट आली आहे. वसुलीला येणाऱ्या वायरमनला गावागावात आक्रमक पद्धतीने रोखले जात आहे.

आता महावितरण आणि शासनानेही जनतेच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये. तातडीने निर्णय घेऊन कोरोनाकाळात भरडलेल्या जनतेला दिलासा द्यावा, नाही तर पुन्हा रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असेही यावेळी झालेल्या चर्चेत सांगितले गेले. या संघर्षात जर महावितरणचे नुकसान झाले तर त्यास आम्ही जबाबदार असणार नाही, असा इशाराही दिला. या शिष्टमंडळात शिवाजी माने, रमेश मोरे, आर. के. पाटील, संजय पाटील, सचिन जमदाडे यांचाही समावेश होता. 

टॅग्स :mahavitaranमहावितरणkolhapurकोल्हापूर