शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
2
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
3
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
4
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
5
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
6
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
7
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
8
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
9
शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने वृद्धेसह पायलटला १० कोटींचा गंडा; बनावट ॲपचा वापर करून लावला चुना
10
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
11
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
12
स्थानके चकाचक, डेपो मात्र घाण; एस.टी.च्या स्वच्छता अभियानात १४९ बसस्थानके नापास
13
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
14
सूरज चव्हाण यांची अखेर हकालपट्टी; छावा कार्यकर्त्यांना मारहाण भोवली
15
आम्हाला तोंड उघडण्यास भाग पाडू नका; ईडी.. तुमचा राजकीय वापर का हाेतोय?
16
हनी ट्रॅपप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी; ‘त्या’ हॉटेल व्यावसायिकाचे जमीन व्यवहार तपासणार
17
मंत्री शिरसाट यांच्या घरात शिरला खतरनाक गुन्हेगार; सुपारी दिल्याचा संशय 
18
मुंबई उच्च न्यायालयाच्या वांद्र्यातील नव्या इमारतीसाठी जमीन ताब्यात!
19
शाळकरी मुलीच्या गळ्याला लावला चाकू; पंधरा मिनिटांच्या थरारानंतर मुलीची सुटका
20
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा

कंटेनरखाली सापडून तरुणीचा मृत्यू

By admin | Updated: February 1, 2016 00:53 IST

मृत तरुणी वडणगेची; कुटुंबीयांच्या आक्रोशाने सर्व हेलावले

नवे पारगाव/पेठवडगाव : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर अंबपवाडी फाट्याजवळ कल्याणी पेट्रोल पंपासमोर कंटेनरच्या मागील चाकाखाली सापडून तरुणीचा मृत्यू झाला. काजल तानाजी लोहार (वय २१, रा. वडणगे, ता. करवीर, जि. कोल्हापूर) असे तिचे नाव आहे. अपघात सकाळी दहाच्या सुमारास झाला. याची वडगाव पोलिसांत नोंद झाली आहे. घटनास्थळ व पोलिसांतून मिळालेली माहिती अशी : काजल तानाजी लोहार ही उचगाव (ता. करवीर) येथील शेफ्स किचन इन्स्टिट्यूट आॅफ सॅलिनरी आर्टस् अ‍ॅँड हॉटेल मॅनेजमेंट या महाविद्यालयात पदविका प्रमाणपत्रचे शिक्षण घेत होती. रविवारी सकाळी ती आपल्या मित्राच्या मोटारसायकलवरून टोपकडून वाठारच्या दिशेने जात होती. हॉटेल पूनमच्या जवळ साताऱ्याच्या दिशेने कंटेनर (पीबी ०६ व्ही ९६४५) जात होता. काजल मित्राच्या मोटारसायकलवर पाठीमागे बसली होती. (मित्राचे नाव व गाडीचा नंबर कळू शकला नाही.) मोटारसायकलचे हँडल कंटेनरच्या डाव्या बाजूला मागील चाकाजवळ अडकल्याने दोघेही पडले. तिचा मित्र बाजूला पडल्याने तो बचावला. काजलचा मृतदेह रस्त्यावरून ओढून बाजूला रस्त्याकडेला ठेवून तिचा मित्र मोटारसायकल घेऊन घटनास्थळावरून पळून गेला. तरुणीच्या मोबाईलवरून तिच्या घरी कळविण्यात आले. वडणगेच्या देवी पार्वती हायस्कूलमध्ये शिपाई म्हणून सेवेत असणारे वडील तानाजी लोहार व भाऊ रोहन हे घटनास्थळी आल्यावर त्यांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. काजलसोबत असणारा मित्र कोण याची कॉल डिटेल्सवरून माहिती घेणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी दिली. घनटेचा तपास हवालदार सुनील चावरे करीत आहेत. (प्रतिनिधी)