कोल्हापूर : चंदूर (ता. हातकणंगले) येथील शिक्षिका संध्या राजेंद्र कांबळे (वय ५६) यांचे निधन झाले. त्या विवेकानंद शिक्षण संस्थेच्या माणगाव (ता. हातकणंगले) येथील ए. पी. मगदूम हायस्कूल येथे शिक्षिका होत्या. कोल्हापूर जिल्हा सहकारी बँकेचे निरीक्षक राजेंद्र कांबळे यांच्या त्या पत्नी होत. त्यांच्या पश्चात पती, मुलगी, जावई, नातवंडे, बहिणी, भाऊ असा मोठा परिवार आहे.
--
सदाशिव व्हणगुत्ते
कोल्हापूर : सानेगुरूजी वसाहत येथील सदाशिव अनंत व्हणगुत्ते (वय ७३) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, सून जावई, नातवंडे असा परिवार आहे
--
दिनकर चौगुले
कोल्हापूर : रामानंद नगर येथील दिनकर भाऊ चौगुले (वय ७२) यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात मुले, सुना, नातवंडे, भाऊ असा परिवार आहे.
--
सुनंदा चौगुले
रामानंद नगर येथील सुनंदा दिनकर चौगुले (वय ६५) यांचे मंगळवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
--
अशोक ओतारी
कोल्हापूर : लक्षतीर्थ वसाहत येथील अशोक शिवराम ओतारी (वय ६७) यांचे शनिवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, मुलगी, जावई असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज रविवारी आहे.
-
बाबासो लोखंडे
कोल्हापूर : जुने पारगाव (ता. हातकणंगले) येथील बाबासो बाळू लोखंडे (वय ४७) यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात भाऊ, बहीण, आई, पत्नी, दोन मुली, मुलगी असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज रविवारी आहे.
--
आनंद आगरवाल
कोल्हापूर : भक्तीपूजा नगर येथील आनंद मालुराम आगरवाल (वय ७८) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मोठा परिवार आहे.
--
रचना नार्वेकर
कोल्हापूर : रेसकोर्स नाका येथील रचना राजेश नार्वेकर (वय ४२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पती, मुलगा, दीर, सासू असा परिवार आहे.
-
सतीश तवार
कोल्हापूर : योगेश्वरी कॉलनी पाचगाव येथील सतीश लक्ष्मण तवार (वय ६०) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, जावई असा परिवार आहे.
---
उद्योजक संजय भस्मे यांचे निधन
कोल्हापूर : येथील एस. व्ही. इंजिनिअरिंगचे मालक संजय वसंतराव भस्मे (वय ५७)यांचे निधन झाले. त्यांचा लक्ष्मीपुरीतील कोंडाओळ येथे त्यांचा पंप्स ॲण्ड व्हाॅल्सचा व्यवसाय होता. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुली असा परिवार आहे. रोटरी क्लब ऑफ होरायझनचे माजी सेक्रेटरी होते. दंतवैद्यक व पत्रकार डॉ. राजेंद्र भस्मे यांचे ते कनिष्ठ बंधू होत.
--
सर्व निधन वार्तांना फोटो आहेत.
---