शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

पन्हाळ्यात तटबंदीवरून पडलेल्या 'त्या' तरुणाचा मृत्यू, मराठी चित्रपटाच्या शुटींगदरम्यान घडली होती दुर्घटना 

By उद्धव गोडसे | Updated: March 28, 2023 19:23 IST

उपचार खर्चाच्या वादातून दिवसभर मृतदेह रुग्णालयातच पडून

कोल्हापूर : पन्हाळा येथे सज्जा कोठी परिसरात चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असताना सेटवरील घोड्यांची देखभाल करणारा तरुण तटबंदीवरून पडून गंभीर जखमी झाला होता. उपचारादरम्यान आज, मंगळवारी (दि. २८) पहाटे जखमी नागेश प्रसांत खोबरे (वय १८, रा. हिप्परगा, जि. सोलापूर) याचा कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात मृत्यू झाला.पन्हाळा येथे महेश मांजरेकर निर्मित वेडात मराठे वीर दौडले सात या मराठी चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे. या चित्रीकरणादरम्यान १९ मार्चला रात्री साडेनऊच्या सुमारास सज्जा कोठी परिसरात नागेश खोबरे हा मोबाइलवर बोलत तटबंदीकडे गेला. अंधारात तटबंदीचा अंदाज न आल्याने खाली पडून नागेश गंभीर जखमी झाला होता. हा प्रकार लक्षात येताच नागेश याला कोल्हापुरातील सीपीआरमध्ये दाखल केले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, मंगळवारी पहाटे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.उपचार खर्चाचा वादजखमी नागेशला उपचारासाठी दाखल केल्यानंतर चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी बोलवलेल्या व्यवस्थापकांनी त्याच्या उपचाराचा खर्च देण्याचे नातेवाईकांकडे कबूल केले होते. मात्र गेल्या दहा दिवसात काहीच खर्चाची रक्कम मिळाली नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. तसेच उपचाराचे पैसे मिळाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका घेतल्याने मंगळवारी दिवसभर मृतदेह रुग्णालयातच पडून होता, अशी माहिती नातेवाईकांनी दिली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर