शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 22:06 IST

उजळाईवाडीतील घटना: अमान भालदार हा राधाबाई शिंदे स्कूल येथे सहावीत शिकत होता.

- मोहन सातपुते लोकमत न्यूज नेटवर्क उचगाव: सरनोबतवाडीत गुरुवार (दि.१२ जून) रोजी झालेल्या ढगफुटी पावसामुळे सरनोबतवाडीच्या ओढ्याच्या पाण्यात वाहून गेलेल्या ११ वर्षीय अमान जमाल भालदार  रा.कोर्ट कॉलनी उजळाईवाडी या मुलाचा शुक्रवारी आपत्ती व्यवस्थापनच्या शोधकार्य पथकाला मृतदेह सापडला. हृदय हेलावून टाकणाऱ्या या घटनेने आईवडिलांनी धायमोखलून फोडलेल्या हंबरड्याने मृतदेह बघणाऱ्या गर्दीतील माणसांचे डोळे अश्रूंनी डबडबले होते.

उजळाईवाडी  (धोंडे नगर कोर्ट कॉलनी ) येथील जमाल भालदार यांचा मोठा मुलगा अमान जमाल भालदार हा सायकल वरून मणेर मळ्यातील खाजगी क्लासला जात होता. अचानक ढगफुटी पाऊस झाला. सरनोबतवाडी- मणेर मळा रस्त्यावरील ओढ्याला आलेल्या पाण्याच्या प्रवाहासोबत अमान भालदार हा सायकलवरून जात असताना वाहून गेला. त्यानंतर त्यांच्या शोधकार्यासाठी आपत्ती व्यवस्थापन व गांधीनगर पोलिसांना बोलावण्यात आले होते. गुरूवारी सायंकाळी साडेपाच वाजता सुरू केलेले शोध कार्य रात्री उशिरापर्यंत सुरू होते. पण रात्र झाल्याने शुक्रवारी सकाळी शोध कार्य सुरु करण्यात आले. स्थानिक नागरिक, आपत्ती व्यवस्थापन पथकाला सरनोबत वाडी येथील ओढ्याच्या काठावर झाडाच्या झुडपात मृतदेह सापडला.

 मृतदेह पाहून भालदार कुटुंबीय, नातेवाईक यांनी हंबरडा फोडलेल्या पाहून अनेकाना अश्रू अनावर झाले.  छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय येथे शवविचेदन करण्यात आले. दुपारी तीन वाजता बागल चौक येथील कबरस्थान येथे त्याचे दफन करण्यात आले.

अमान भालदार हा राधाबाई शिंदे स्कूल येथे सहावीत शिकत होता. जमाल भालदार यांचे उजळाईवाडी विमानतळ रोडवरील सरस्वती मंगल कार्यालय जवळ अमान इंटरप्राइजेस हे खाद्य पदार्थाचे दुकान आहे.या घटनेनंतर भालदार कुटुंबीय यांच्या घरी आप्तेवाईक, मित्र मंडळी,यांची रीघ लागली होती. त्याच्या पश्चात आई- वडील, लहान बहीण यांच्यासह मोठा परिवार आहे. 

अमान हा खेळकर व विनोदी स्वभावाचा  होता. संवेदनशील वृत्तीचा आणि तितकाच सहज सेवा करणारा होता. नेहमी हसत मुख असलेल्या मुलाच्या जाण्याने आईने फोडलेला हंबरडा हृदय हेलावून टाकणारा होता.

टॅग्स :drowningपाण्यात बुडणेkolhapurकोल्हापूर