शहरं
Join us  
Trending Stories
1
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
2
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
3
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
4
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
5
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
6
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
7
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
8
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?
9
'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?
10
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
11
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
12
इन्फेक्शन झाले म्हणून २८ वर्षांचा तरुण डॉक्टरकडे गेला, त्याने प्रायव्हेट पार्टच कापून टाकला...
13
Sanjay Raut : "अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप...", संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र
14
कडक सॅल्यूट! ऐकता, बोलता, पाहता येत नाही; कठोर परिश्रमाने मिळवली सरकारी नोकरी
15
“आता काय, राज तुमच्यात येणार, तुमची पॉवर वाढणार”; शिंदेंच्या मंत्र्यांची ठाकरे गटाला कोपरखळी
16
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट
17
Ashadhi Ekadashi 2025: चातुर्मासात विष्णू योगनिद्रा घेतात तेव्हा विश्वाचा सांभाळ कोण करतं?
18
२ दिवसांच्या धक्क्यातून बाजार सावरला, पण टाटा-महिंद्रासह 'या' कंपनीला मोठा फटका! तुमचे पैसे सुरक्षित आहेत का?
19
"राज ठाकरेंचं मराठीवर नाही तर राजकारणावर प्रेम", काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका

मुलीचा रेबिजने मृत्यू

By admin | Updated: February 22, 2017 21:13 IST

पिसाळलेल्या मांजराच्या चाव्यात सहा वर्षाच्या मुलीचा रेबिजने अखेर दुर्दैवी मृत्यू झाला.

ऑनलाइन लोकमत

कोल्हापूर, दि. 22 : बांबवडे (ता. शाहूवाडी) येथे पिसाळलेल्या मांजराच्या चाव्यात सहा वर्षाच्या मुलीचा रेबिजने अखेर दुर्दैवी मृत्यू झाला. इक्रा झाकीर मणेर असे त्या बालिकेचे नाव आहे. इक्राच्या सहवासात आलेल्या घरातील व शाळेतील ३५ मुलांना संभाव्य धोका ओळखून बुधवारी सीपीआरमध्ये रेबिजची लस दिली. तिच्यावर वेळीच उपचार झाले असते तर ही दुर्दैवी वेळ आली नसती. तिच्या मृत्यूमुळे मणेर कुटुंबिय बिथरले आहे. अधिक माहिती अशी, बांबवडे येथील अवचितनगर परिसरात राहणारे झाकीर मणेर हे मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. सहा महिन्यांपूर्वीत्यांच्या पत्नीचा आजारपणात मृत्यू झाला. त्यांना तीन मुली. इक्रा बालवाडीत शिकत होती. परिसरातील पाळीव मांजराचा भटक्या कुत्र्याने चावा घेतला होता. त्यामुळे मांजर पिसाळले होते. पंधरा दिवसांपूर्वी त्याच मांजराने इक्राच्या हात व पायाचा चावा घेतला. मांजर चावल्याने काही होत नाही, असे समजून त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर इक्रा आजोळी आजीकडे येऊन राहिली. तिच्या राहणीमानात, बोलण्यात फरक जाणवू लागला. तोंडातून लाळ गळू लागली. हातवारे करून ओरडू लागल्याने येथील नातेवाईकांनी तिला गावठी औषध दिले. त्यातून काहीच गुण आला नाही. त्यामुळे ती पुन्हा वडिलांकडे आली. बांबवडे येथील खासगी रुग्णालयात तिच्यावर उपचार केले. या दरम्यानच्या कालावधीत तिने शेजारी राहणारे व शाळेत सहवासात येणाऱ्या मुलांना ओरखडे ओढले होते. तिची प्रकृती अत्यवस्थ झाल्याने तिला सीपीआरमध्ये दाखल केले. याठिकाणी तिला रेबिज झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. उपचार सुरू असतानाच शनिवारी (दि. १८) तिचा मृत्यू झाला. झाकीर मणेर यांना पत्नीपाठोपाठ मुलीच्या मृत्यू जिव्हारी लागला. येथील डॉक्टरांनी संभाव्य धोका ओळखून इक्राच्या सहवासात आलेल्या ३५ बालकांना बुधवारी सीपीआरमध्ये रेबिजची लस दिली. त्यासाठी पालक आपल्या मुलांना बांबवडेहून कोल्हापुरात घेऊन आले होते. या बालकांना दिली लस बुशरा झाकीर मणेर, गौसिया मणेर, शिफा रियाज अत्तार, मिस्बा रियाज अत्तार, अलवीरा सूरज मणेर, तमन्ना इब्राहिम मणेर, अलिया इब्राहिम मणेर, रेहान फिरोज अत्तार, अरहान अत्तार, अन्सफा रफिक अत्तार, नासीर अत्तार, समीरा सरदार मणेर, साजिदा मणेर, सुबहान मणेर, सानिया समीर शिकलगार, शाहीद शिकलगार, आयान गोलंदाज, मुस्तकिम समीर गोलंदाज, हुमेरा गोलंदाज, इरशत वाशिम शेख, रेहान अरिफ गोलंदाज, आलिया गोलंदाज, आरसलान यासीन मणेर, सुफियान यासीन मणेर, अयाज सलीम मुल्लाणी, सुफिया मुल्लाणी.