शहरं
Join us  
Trending Stories
1
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
2
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
3
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
4
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
5
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
6
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
7
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
8
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
9
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
10
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
11
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
12
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
13
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
14
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
15
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
16
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
17
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
18
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
19
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
20
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?

CoronaVIrus In kolhapur : कोरोनाने घरच संपवले : मुुलीच्या मृत्यूच्या धक्क्याने पित्याचाही मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 10:59 IST

CoronaVIrus In kolhapur : चार दिवसांपूर्वी एकुलत्या एका तरुण मुलीचा कोरोनाने मृत्यू झाला. तिच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने मंगळवारी सकाळी ५६ वर्षीय पित्याचाही हृदयविकाराने मृत्यू झाला, तर आईही कोरोना पॉझिटिव्ह असून त्यांनाही मानसिक धक्का बसून त्याही शून्यात गेल्या. कोरोनाने अशा पद्धतीने एका कुटुंबांची वाताहत झाल्याची दुर्दैवी घटना राजारामपुरी दुसरी गल्ली, टाकाळा येथे घडली.

ठळक मुद्देमुुलीच्या मृत्यूच्या धक्क्याने पित्याचाही मृत्यू; आईचेही मानसिक संतुलन बिघडलेकोल्हापुरातील टाकाळा परिसरातील सुन्न करणारी घटना

कोल्हापूर : चार दिवसांपूर्वी एकुलत्या एका तरुण मुलीचा कोरोनाने मृत्यू झाला. तिच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने मंगळवारी सकाळी ५६ वर्षीय पित्याचाही हृदयविकाराने मृत्यू झाला, तर आईही कोरोना पॉझिटिव्ह असून त्यांनाही मानसिक धक्का बसून त्याही शून्यात गेल्या. कोरोनाने अशा पद्धतीने एका कुटुंबांची वाताहत झाल्याची दुर्दैवी घटना राजारामपुरी दुसरी गल्ली, टाकाळा येथे घडली.टाकाळा चौकानजीकच्या अपार्टमेंटमध्ये एक वृद्ध दांपत्य २५ वर्षीय मुलगीसह राहत होते. त्यातील वृद्धा ही सीपीआरमधून नर्स म्हणून सेवानिवृत्त झाल्याने त्यांच्या पेन्शनवरच कुटुंबाचा गाडा चालत होता. शुक्रवारी त्यांच्या मुलीचा कोरोनाने बळी घेतला. मुलगी गेल्याचा जबर धक्का दांपत्याला बसला. त्यातच वृद्ध आईची चाचणी पॉझिटिव्ह आली, तर वडिलांची निगेटिव्ह आली, पण दोघेही मुलीच्या मृत्यूच्या मानसिक धक्क्यातून बाहेर आले नाहीत.मंगळवारी त्यांनी फ्लॅटचा दरवाजा उघडला नाही. त्यामुळे तेथील तरुणांनी राजारामपुरी पोलिसांना कळविले. पोलिसांनी दुपारी येऊन दरवाजा उघडला असता वृद्धा या पतीच्या मृतदेहानजीक शून्यात बसून होत्या. त्याही पॉझिटिव्ह असल्याची माहिती असल्याने मदतीसाठी शेजारील कोणीही पुढे जाण्याचे धाडस करत नव्हते.पोलिसांनीच धाडसाने पुढे जाऊन मृतदेह तपासला असता वृद्ध मृत आढळले. डॉक्टरांनीही त्यांचा मृत्यू हृदयविकाराने झाल्याचे सांगितले. संबंधित वृद्ध महिलेलाही धक्का बसल्याने त्यांचेही मानसिक संतुलन बिघडले होते. त्याही शून्य नजरेत बसूनच होत्या. अखेर सायंकाळी त्यांना रुग्णवाहिकेतून अलगीकरण कक्षात दाखल केले, तर काही नातेवाइकांना बोलवून त्या वृद्धाच्या मृतदेहावर पंचगंगा स्मशानभूमीत मंगळवारी सायंकाळी अंत्यसंस्कार केले.दक्षता न घेतल्याने अख्ख्या कुटुंबांची वाताहतकोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असताना त्यातच अनेक कुटुंबांची वाताहात होत आहे. कोरोना पॉझिटिव्ह झालेल्यांना मदतीसाठीही कोणीही धावून येत नाही. दक्षता न घेतल्याने घरात एका व्यक्तीमुळे अनेकांना संसर्ग होऊन अख्खे घरच उद्‌ध्वस्त होत आहेत. राजारामपुरी दुसऱ्या गल्लीत अशीच घटना मंगळवारी घडली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर