शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
3
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
4
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
5
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
6
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
7
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
8
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
9
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
10
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
11
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
12
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
13
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
14
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
15
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
16
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
17
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
18
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
19
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
20
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!

अंत्यविधीसाठी दाखल्याची सक्ती नव्हे मरणयातना!, कुटुंब प्रमुखाची माहिती ग्राह्य धरण्याची तरतूद

By भीमगोंड देसाई | Updated: December 15, 2023 14:02 IST

भीमगोंडा देसाई  कोल्हापूर : जन्म, मृत्यू नोंदणी कायद्यानुसार एखाद्याचा मृत्यू घरी झाल्यास कुटुंब प्रमुखाच्या माहितीनुसार अंत्यविधी करणे बंधनकारक असताना ...

भीमगोंडा देसाई कोल्हापूर : जन्म, मृत्यू नोंदणी कायद्यानुसार एखाद्याचा मृत्यू घरी झाल्यास कुटुंब प्रमुखाच्या माहितीनुसार अंत्यविधी करणे बंधनकारक असताना बेकायदेशीरपणे महापालिका आरोग्य विभाग वैद्यकीय अधिकाऱ्याच्या दाखल्याची सक्ती करत आहे. परिणामी वैद्यकीय दाखला मिळेपर्यंत मृतदेह तासनतास घरीच ठेवावा लागत आहे. यामध्ये दाखला मिळवण्याच्या व्यवस्थेबद्दल पुरेसे ज्ञान नसणाऱ्या नातेवाइकांची हेळसांड होत आहे. त्यांना नाहक कोणाकडे तरी जाऊन दाखल्यासाठी याचना करावी लागत आहे.

माणसाचे कायदेशीर आयुष्य निश्चित करण्यासाठी जन्म आणि मृत्यू नोंद अतिशय महत्त्वाची आहे. यासाठी कायदा आहे. या कायद्यानुसार या नोंदी करणे बंधनकारक आहे. कायद्यातील तरतुदीनुसार घरी मृत्यू झाल्यास कुटुंब प्रमुखांनी मयताची माहिती दिल्यानंतर अंत्यविधी आणि मृत्यू नोंद करणे आवश्यक आहे.मात्र येथील महापालिका आरोग्य प्रशासन ज्यांच्या घरी मयत झाले आहेत त्यांच्या नातेवाइकांनाच वैद्यकीय अधिकाऱ्याचा दाखला आणा, अन्यथा अंत्यसंस्कार करता येणार नाही, अशी नियमबाह्य आडकाठी लावत आहे. अशीच कार्यपद्धती राबवावी, असे कोठेही कायद्यात नाही, तरी महापालिका प्रशासन नातेवाइकांना वेठीस धरत असल्याचे समोर आले आहे.कायद्यातील पळवाट शोधून काही जण मालमत्ता व इतर कारणांसाठी जिवंत असणारे व्यक्ती मयत दाखवतील, घरात घातपाताने मयत होऊ शकते, अशी शक्यता गृहीत धरून महापालिका प्रशासन सरसकट सर्वांनाच घरी मयत झाली तर वैद्यकीय अधिकाऱ्यांचा दाखला आणा, अन्यथा तुम्हाला अंत्यसंस्कार करता येणार नाही, असा स्वयंघोषित नियम लावत आहे. परिणामी दाखला मिळाला नाही तर अंत्यसंस्कार रखडत आहे. याकडे लक्ष वेधून महापालिका प्रशासन गांभीर्याने पाहत नसल्याचे चित्र आहे.

दवाखान्यात मृत्यू झाल्यास दाखला मिळतो..दवाखान्यात मृत्यू झाल्यास किंवा शवविच्छेदन झाल्यास मृत्यूचा दाखला सहजपणे मिळतो. पण घरी मृत्यू झाल्यास दाखल्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांचा शोध घ्यावा लागत आहे. शोध घेऊन दाखला मिळवावा, अशी कायद्यात कोठेही म्हटलेले नसताना महापालिका अशी का सक्ती करीत आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मृत्यू प्रमाणपत्राचा उपयोग काय?वडिलोपार्जित हक्क आणि संपत्ती या विषयाचा निर्णय घेणे, विम्याच्या दाव्यासाठी, कुटुंबाचे निवृत्तिवेतन मिळण्यासाठी मृत्यू दाखला प्रमाणपत्राची आवश्यकता भासते. यामुळे मृत्यू नोंद २१ दिवसांच्या आत करून घ्यावी लागते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर