शहरं
Join us  
Trending Stories
1
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
2
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
3
प्रकरण शमविले? अजित पवार दोनदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, पार्थ पवार 'ती' जमीन परत देण्याची शक्यता 
4
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
5
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
6
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
7
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
8
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
9
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?
10
सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात बंद! 'या' सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण, पण PSU बँकांमध्ये मोठी तेजी!
11
आता घरबसल्या पाहा 'आरपार', ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेचा रोमँटिक सिनेमा ओटीटीवर रिलीज
12
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
13
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
14
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'
15
Smartphone Hacking : व्हॉट्सअ‍ॅपवर RTOचा मेसेज आला? चुकूनही त्यावर क्लिक करू नका! नाहीतर...
16
'अमेरिका, चीन, पाकिस्तान कोणीही आपल्यावर दबाव आणू शकत नाही'; अणुचाचणीच्या चर्चेवर राजनाथ सिंह यांचं मोठं विधान
17
धक्कादायक! मुंग्यांच्या भीतीने गमावला जीव, कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे हे होतं?
18
Hanuman Upasana: दिवसाची सुरुवात 'या' मंत्राने कराल तर २१ दिवसांत फरक बघाल!
19
Indonesia: इंडोनेशियात नमाज वेळी मशिदीत स्फोट; ५० हून अधिक जण जखमी!
20
राहुल गांधींच्या ‘या’ आवडत्या शेअरची बाजारात धूम; कंपनीची एकाच दिवसात १७ हजार कोटींची कमाई

वंचित एच.आय.व्ही.बाधितांना मिळणार दिशा! ‘लिंकेज लॉस’ मोहीम : जिल्ह्यातील २२ हजारांचा शोध घेणार; आॅक्टोबरपर्यंत मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 00:36 IST

कोल्हापूर जिल्ह्णात २०१४ पासून ए.आर.टी. पासून वंचित राहिलेले रुग्ण शोधून काढण्यासाठी ‘मॉप अप’ ही लिंकेज लॉस मोहीम शासनाच्यावतीने राबविली जाणार आहे.

गणेश शिंदे ।कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्णात २०१४ पासून ए.आर.टी. पासून वंचित राहिलेले रुग्ण शोधून काढण्यासाठी ‘मॉप अप’ ही लिंकेज लॉस मोहीम शासनाच्यावतीने राबविली जाणार आहे. या मोहिमेअंतर्गंत एच.आय.व्ही. बाधितांचा शोध घेण्यात येणार आहे; त्यामुळे वंचित एच.आय.व्ही. बाधितांना दिशा मिळणार आहे. सध्या जिल्ह्णामध्ये साधारणत: २२ हजार एच.आय.व्ही. बाधित व्यक्ती आहेत. ही मोहीम आॅक्टोबर २०१८ अखेर राबविली जाणार आहे.राज्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्णातील एच.आय.व्ही. बाधितांची संख्या लक्षणीय आहे. गेली काही वर्षे नवीन एच.आय.व्ही. बाधित व्यक्ती आढळल्यास त्यांना औषधोपचारांबरोबर त्यांच्या आरोग्यविषयक व विविध शासकीय सायी-सुविधा पुरविण्यासाठी केंद्रस्तरावर राष्ट्रीय एडस् नियंत्रण कार्यक्रम राबविला जात आहे. जिल्हास्तरावर जिल्हा एडस् प्रतिबंध व नियंत्रण पथकाद्वारे हे काम केले जाते. सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये मोफत एच.आय.व्ही. तपासणी व समुपदेशन केले जाते. एच.आय.व्ही. बाधित व्यक्ती आढळल्यास त्याचे आयुर्मान वाढविण्यासाठी समुपदेशन महत्त्वाचे ठरते. ए.आर.टी. नावाची औषधप्रणाली सुरू केल्यास त्या रुग्णाचे आयुर्मान वाढण्यास मदत होते, अशी एच.आय.व्ही. बाधित व्यक्ती आढळल्यास त्या व्यक्तीची सी.डी.फोर, सी.बी.सी. इत्यादी तपासण्या करून औषधप्रणाली सुरू केली जाते.याचबरोबर बाधित व्यक्तीच्या जोडीदाराचीसुद्धा तपासणी करणे गरजेचे असते; पण काही रुग्ण एच.आय.व्ही. तपासणीनंतर अहवाल घेण्यासाठी आय.सी.टी.सी.कडे येत नाहीत. ए.आर.टी. केंद्रात नाव नोंदवून परत फिरकत नाहीत, तर काही रुग्ण विविध कारणांमुळे मध्येच औषध घेणे सोडून देतात. ए.आर.टी. केंद्राकडे येण्यास टाळाटाळ करतात. काहीजण चुकीचे पत्ते, फोन नंबर देतात; यासाठी आर्थिक परिस्थिती, औषधांबद्दल व आजाराबद्दल असणारे गैरसमज, सामाजिक भीती, आजाराकडे दुर्लक्ष, औषधांचे दुष्परिणाम अशी कारणे आहेत. सीपीआरचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पीपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्णामध्ये ही मोहीम राबविली जाणार आहे.अशी राहणार प्रक्रियारुग्ण सापडल्यानंतर त्याचे समुपदेशन करून ए.आर.टी. केंद्राकडे संदर्भित केले जाणार आहेत. स्वत: कर्मचारी ए.आर.टी. केंद्राकडे रुग्णास घेऊन जातील व सी.डी.फोर, सी.बी.सी. सारख्या तपासण्या करून औषधोपचार सुरू केले जाणार आहेत.यांची मदत...आय.सी.टी.सी. समुपदेशक, प्रयोगशाळा तंत्रज्ञए.आर.टी. कर्मचारी, स्वयंसेवी संस्थाए.एन.एम., आरोग्य सेवक,अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविकाया ठिकाणी सेवा उपलब्ध...सीपीआर रुग्णालय, सावित्रीबाई फुले रुग्णालय, लोटस मेडिकल फौंडेशनकोल्हापुरातील ए. आर. टी. केंद्र,इचलकरंजीतील आय. जी. एम.गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालययांचा घेतला जाणार शोधजे.आय.सी.टी.सी.चा एच.आय.व्ही. पॉझिटिव्ह अहवाल घेऊन पुढील उपचारासाठी ए.आर.टी.ला गेलेले नाहीत.ए.आर.टी. केंद्रात गेले आहेत; परंतु नावनोंदणी करून पुन्हा आलेले नाहीत किंवा काहीनी औषध घेणे मधेच सोडून दिलेले आहे. 

एच.आय.व्ही. बाधित व्यक्तींना समुपदेशनाबरोबर ए.आर.टी. औषध सुरू करण्यात येईल. पूर्वीसारखी सी.डी.फोरची अट न घालता प्रत्येक एच.आय.व्ही. बाधितांना औषधप्रणाली चालू केली जाते. तसेच संजय गांधी निराधार योजना, बालसंगोपन योजना यांसारख्या शासकीय योजनादेखील मिळवून दिल्या जातात. जे एच.आय.व्ही. बाधित रुग्ण ए.आर.टी.ला पोहोचलेले नाहीत, त्यांनी नजीकच्या सरकारी रुग्णालयाशी अथवा ए.आर.टी. केंद्राशी संपर्क साधावा.- दीपा शिपूरकर,जिल्हा कार्यक्रम अधिकारी, कोल्हापूर.