शहरं
Join us  
Trending Stories
1
अफगाणिस्तानच्या हल्ल्यात पाकिस्तानचे ५८ सैनिक ठार; तालिबान सरकारने ISIS बद्दल काय सांगितलं?
2
चाबहार बंदर, वाघा बॉर्डर आणि..; भारत-अफगाणिस्तानात 'या' मुद्द्यांवर चर्चा, मुत्ताकी यांची माहिती
3
'मुलींनी रात्री बाहेर पडू नये', दुर्गापूर सामूहिक बलात्कार प्रकरणावर ममता बॅनर्जींचे वादग्रस्त वक्तव्य
4
घरात घुसली ८ फूट लांब आणि ८० किलोंची मगर; पठ्ठ्याने एकट्यानेच नेली उचलून
5
धक्कादायक! कपडे उतरवून पोलिसांनी हैवानासारखं मारलं, धमन्या फुटल्या; तरुणाचा मृत्यू
6
'वनडे क्वीन' स्मृतीनं रचला नवा इतिहास; ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियन विरुद्ध साधला मोठा डाव
7
“कोकणाच्या भूमीतील या न्याय मंदिरातून स्थानिकांना जलद गतीने न्याय मिळेल”: एकनाथ शिंदे
8
‘लंच पे चर्चा’! राज ठाकरे आईसोबत पुन्हा मातोश्रीवर; उद्धव ठाकरेंसोबत स्नेहभोजनाचा कार्यक्रम
9
गृह कर्जाचा हप्ता भरणं जड जातंय? ईएमआय कमी करण्यासाठी 'या' ५ स्मार्ट ट्रिक्स वापरा आणि मोठी बचत करा!
10
“दादा भुसेंचे ट्रम्प यांच्याशी घनिष्ट संबंध असतील, पालकमंत्रीपद...”; गिरीश महाजनांचा टोला
11
अर्धा संघ तंबूत धाडत कुलदीप यादवनं रचला इतिहास; दिल्लीच्या मैदानात मारला विश्वविक्रमी 'पंजा'
12
तुम्हालाही मस्त नेलपेंट लावायला आवडते? ठरेल जीवघेणं, वाढू शकतो स्किन कॅन्सरचा धोका
13
तुम्हीही होऊ शकता कोट्यधीश! विद्यार्थी, गिग वर्कर्ससाठी 'मायक्रो SIP' चा नवा सुपरहिट ट्रेंड
14
"जर तुम्ही कॉफी बनवायला शिकला असाल तर...", राहुल गांधींच्या दक्षिण अमेरिका दौऱ्यावर भाजपचा निशाणा
15
“तरे म्हणाले होते हा माणूस दगा देईल, तेच झाले, आता पश्चाताप झाला नसता”; ठाकरेंची शिंदेवर टीका
16
नोकरीच्या बचतीची चिंता सोडा! 'या' ४ सोप्या मार्गांनी घरबसल्या तपासा तुमचा PF बॅलन्स
17
Pune Crime: गर्लफ्रेंडच्या मोबाईलमध्ये दुसऱ्या पुरुषासोबतचे नग्न फोटो, बॉयफ्रेंडने केक कापायच्या चाकूनेच तरुणीची हत्या
18
घाईत घेतलेला निर्णय महागात; अमिताभ बच्चन यांनी मुलांच्या ओव्हर कॉन्फिडन्सवर टाकला प्रकाश
19
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री पुन्हा पत्रकार परिषद घेणार, महिला पत्रकारांना विशेष आमंत्रण
20
अफगाणिस्तान vs पाकिस्तान; थेट युद्धात कोणाचे सैन्य वरचढ ठरेल? जाणून घ्या...

एका दिवसात तीन लाख भाविकांनी घेतले दर्शन

By admin | Updated: October 17, 2015 00:51 IST

वाहतूक कोलमडली : अंबाबाई दर्शनासाठी गर्दीचा विक्रम!

कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवानिमित्त झालेल्या गर्दीचे आतापर्यंतचे सगळे उच्चांक मोडत शुक्रवारी २ लाख ९० हजार ३२० भाविकांनी करवीरनिवासिनी अंबाबाईचे दर्शन घेतले. या गर्दीमुळे दर्शन मंडप अपुरे पडून भाविकांना भरउन्हात रांगेत थांबावे लागले. केवळ मंदिराबाहेरीलच नव्हे तर शहरातील वाहतूक व्यवस्था कोलमडली; तर पार्किंगच्या जागाही हाउसफुल्ल झाल्याने बाहेरुन आलेल्या भाविकांना पार्किंगसाठी शोधाशोध करावी लागत होती. मात्र, एवढ्या गर्दीतही कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. नवरात्रौत्सवाच्या पहिल्या दिवशी १ लाख ६६ हजार भाविकांनी देवीचे दर्शन घेतले होते. मात्र, शुक्रवारी रात्री आठ वाजेपर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार मंदिराच्या चारही दरवाजांवर एकूण २ लाख ९० हजार ३२० भाविकांच्या उपस्थितीची नोंद झाली आहे. यात महाद्वारमध्ये ४७ हजार ८७६, घाटी दरवाजा येथे ४३ हजार ४१९, पूर्व दरवाजा येथे पुरुष ४९ हजार ३१०, महिला ७२ हजार ४६४, विद्यापीठ गेट ७७ हजार २५१ इतकी नोंद झाली आहे. शुक्रवार हा दिवस दुर्गेच्या उपासनेचा असल्याने पहाटे चार वाजल्यापासून मंदिरात भाविकांच्या दर्शनरांगा होत्या. सकाळी आठ वाजताच महिला भाविकांची पूर्व दरवाजातील मुख्य दर्शनरांग भवानी मंडपात गेली होती. येथेही पाच ते सहा रांगा करण्यात आल्या होत्या. एरव्ही ओस असणारी पुरुषांची दर्शनरांगही आज भरून गेली होती. पुरुषांची रांग, जोतिबा रोडमार्गे भाऊसिंगजी रोडपर्यंत आली होती. अचानक झालेल्या एवढ्या गर्दीने मंदिराचे व्यवस्थापन मात्र कोलमडले. रांगांचे नियोजन करताना पोलीस, कार्यकर्ते, स्वयंसेवी संस्थांंवरही ताण आला. स्वयंसेवी व्यक्ती व संस्थांनी पिण्याच्या पाण्याची सोय केल्याने भाविकांसाठी तो मोठा दिलासा ठरला. मंदिरात कासव चौक आणि गरुड मंडप येथे मुखदर्शनाची सोय केली होती. मात्र, येथेही गर्दीवर नियंत्रण ठेवणे अवघड जात होते. मंदिराकडे जाणाऱ्या सगळ्याच मार्गांवर प्रचंड गर्दी असल्याने शहरातील वाहतूक व्यवस्था पुरती कोलमडली. त्यावर पर्याय म्हणून महापालिका चौकात बॅरिकेटस लावून वाहने सोडली जात होती. शिवाजी चौक, बिंदू चौक, भवानी मंडप, महापालिका ते अगदी लक्ष्मीपुरीपर्यंत वाहतूक खोळंबली होती.