शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टर्स आणि प्रशासनातील एकवाक्यतेमुळे कोरोनावर मात : दौलत देसाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2020 15:59 IST

कोरोनाच्या या संकटामध्ये शासकीय डॉक्टर्स, खाजगी डॉक्टर्स आणि प्रशासन यांच्यामध्ये एकवाक्यता होती. त्यामुळेच आपण कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनावर मात करत आहोत असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. दौलत देसाई यांनी केले.

ठळक मुद्देडॉक्टर्स आणि प्रशासनातील एकवाक्यतेमुळे कोरोनावर मात : दौलत देसाईडॉक्टर्स डे निमित्त कोरोना योध्दयांचा सत्कार

कोल्हापूर : कोरोनाच्या या संकटामध्ये शासकीय डॉक्टर्स, खाजगी डॉक्टर्स आणि प्रशासन यांच्यामध्ये एकवाक्यता होती. त्यामुळेच आपण कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनावर मात करत आहोत असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. दौलत देसाई यांनी केले.कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्यावतीने बुधवारी कोरोना योध्दा डॉक्टरांच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी देसाई बोलत होते. महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांची प्रमुख उपस्थिती होती.देसाई म्हणाले, डॉक्टर व प्रशासन एकत्र येऊन काम करण्याच्या कोल्हापूरच्या पॅटर्नने राज्यात व देशात एक नवा आदर्श घालून दिला आहे . कोल्हापुरातील महापुराची परिस्थिती किंवा आता कोविड परिस्थिती असो, ती उत्कृष्टपणे हाताळण्यात सर्वप्रथम डॉक्टर्सनी धीर दिला त्याचबरोबर सहकार्य केले.डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी म्हणाले, महापालिकेच्या दवाखान्यांनी आता कात टाकली आहे. पंचगंगा, आयसोलेशन, सावित्रीबाई फुले हॉस्पिटल येथे अत्यंत अल्प दरात चांगले उपचार मिळत आहेत. याचा लाभ हजारो गरीब वंचित नागरिक घेत आहेत. कोल्हापूरला निरोगी बनवण्यासाठी डॉक्टर्स आणि प्रशासन यांनी हातात हात घालून काम करण्याची गरज आहे.यावेळी मेडिकल असोसिएशन, सीपीआर, डॉ. डी.वाय.पाटील हॉस्पिटलसह खासगी हॉस्पिटलमधील डॉक्टरांचा इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर, मेन्स,रोटरी क्लब ऑफ गार्गीज व इनरव्हील क्लब ऑफ सनराइज यांच्यावतीने गौरव करण्यात आला. डॉक्टरांचा सांगितिक कार्यक्रम फेसबुक लाईव्हद्वारे सादर करण्यात आला.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूरdocterडॉक्टर