शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दौलत देसाई कोल्हापूरचे नवे जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2019 14:14 IST

कोल्हापूरचे नवे जिल्हाधिकारी म्हणून दौलत देसाई यांची शुक्रवारी शासनाने नियुक्ती केली. मावळते जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांची बदली अद्याप झालेली नाही. मंत्रालयातून सोमवारी (दि. ११) कार्यमुक्त झाल्यानंतर बहुधा बुधवार (दि. १३) नंतर येथे रुजू होणार असल्याचे देसाई यांनी सांगितले. देसाई हे सध्या मंत्रालयात मदत व पुनर्वसन विभागात आपत्ती व्यवस्थापन संचालक म्हणून काम करीत होते. ते मूळचे कणकवली येथील आहेत.

ठळक मुद्देदौलत देसाई कोल्हापूरचे नवे जिल्हाधिकारीबुधवारनंतर रुजू : सुभेदार यांना बदलीची प्रतीक्षा

कोल्हापूर : कोल्हापूरचे नवे जिल्हाधिकारी म्हणून दौलत देसाई यांची शुक्रवारी शासनाने नियुक्ती केली. मावळते जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांची बदली अद्याप झालेली नाही. मंत्रालयातून सोमवारी (दि. ११) कार्यमुक्त झाल्यानंतर बहुधा बुधवार (दि. १३) नंतर येथे रुजू होणार असल्याचे देसाई यांनी सांगितले. देसाई हे सध्या मंत्रालयात मदत व पुनर्वसन विभागात आपत्ती व्यवस्थापन संचालक म्हणून काम करीत होते. ते मूळचे कणकवली येथील आहेत.जिल्हाधिकारी सुभेदार हे गेली दोन वर्षे या पदावर आहेत; परंतु कौटुंबिक कारणास्तव त्यांनी शासनाकडे बदलीची मागणी केली आहे. मुंबईत कुठेही बदली व्हावी, अशी त्यांनी विनंती केली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत त्यांची बदली होईल. नवे जिल्हाधिकारी देसाई हे भारतीय प्रशासन सेवेतील २००८ च्या तुकडीचे अधिकारी आहेत. गेली २३ वर्षे त्यांनी महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे.

मुंबईत सेल्स टॅक्स अधिकारी म्हणून त्यांची कारकिर्द १९८८ ला सुरू झाली. त्यानंतर त्यांनी सोलापूर, फलटण, वाई, पुणे येथे प्रांताधिकारी म्हणून काम केले. अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी ‘मेडा’कडेही काम केले. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडे त्यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून काम केले. त्यानंतर पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही त्यांनी काम केले.मुंबईत नुकतीच झालेली आपत्ती व्यवस्थापनातील वर्ल्ड काँग्रेस यशस्वी करण्यात त्यांचा मोठा वाटा राहिला. ‘आॅस्ट्रेलियन रेन्युएबल एनर्जी अ‍ॅँड एनर्जी इफिन्शियन्सी पॉलिसीज’ या विषयांचा त्यांनी अभ्यास केला आहे. वातावरणातील बदल, शाश्वत ऊर्जा या विषयांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

शिवाजी पूलप्रश्नी महत्त्वाची मदतआपत्ती व्यवस्थापनाचे संचालक म्हणून देसाई यांची कोल्हापुरातील पर्यायी शिवाजी पुलाच्या बांधकामास परवानगी देण्यास मोठी मदत झाली आहे. त्यामुळे येथे येण्याअगोदरपासूनच ते जिल्ह्यातील प्रश्नांचे जाणकार आहेत.

 

कोल्हापूर हा विकासाच्या प्रवाहातील महत्त्वाचा जिल्हा आहे. त्यामुळे अशा जिल्ह्यात काम करण्याची संधी मिळणे याचा मला आनंदच आहे. या संधीचा उपयोग करून अधिकाधिक चांगले काम करून दाखविण्याचा माझा प्रयत्न राहील.- दौलत देसाईनूतन जिल्हाधिकारी, कोल्हापूर 

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर