शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा नवा निर्णय; भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
5
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
6
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
7
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
8
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
9
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
10
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
11
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
12
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
13
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
14
ठाण्यातील अवजड वाहन बंदीचा ताप! मुंबई अहमदाबाद महामार्गावर देखील अवजड वाहनांना बंदी
15
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
16
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
17
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
18
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
19
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
20
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत

माधवी गवंडी कोल्हापूरच्या महापौरपदी बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 14:34 IST

कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौरपदी माधवी प्रकाश गवंडी यांची मंगळवारी बिनविरोध निवड झाली. महानगरपालिकेतील सत्ता संघर्षाला नाट्यमय वळण मिळाल्याने राष्ट्रवादी कॉँग्रेसतर्फे गवंडी यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला होता. महापौरपदावर आजपर्यंत कोल्हापूर शहरातील व्यक्ती विराजमान झाल्या.

ठळक मुद्देमाधवी गवंडी यांना बहुमान निवड जाहीर होेताच जल्लोष

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौरपदी माधवी प्रकाश गवंडी यांची मंगळवारी बिनविरोध निवड झाली. महानगरपालिकेतील सत्ता संघर्षाला नाट्यमय वळण मिळाल्याने राष्ट्रवादी कॉँग्रेसतर्फे गवंडी यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला होता. महापौरपदावर आजपर्यंत कोल्हापूर शहरातील व्यक्ती विराजमान झाल्या.कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौरपदाचा सरीता मोरे यांनी राजीरामा दिला होता. रिक्तपदाकरीता मंगळवारी महापौरपदाची निवडणुक घेण्यात आली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा पिठासन अधिकारी अमन मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा झाली. महापौरपदाकरीता माधवी प्रकाश गवंडी यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्यामुळे त्यांची निवड अपेक्षित होती.

सभेचे कामकाज सुरु होताच पिठासन अधिकारी मित्तल यांनी निवडणुक कार्यक्रमाचे वाचन केले. निवडणुक प्रक्रियेनुसार उमेदवारी अर्ज मागे घेण्याकरीता पंधरा मिनिटांचा अवधी देण्यात आला. हा अवधी संपताच मित्तल यांनी माधवी गवंडी यांची महापौर म्हणून बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. निवड जाहीर होताच गवंडी समर्थकांनी महापालिकेसमोर वाद्यांच्या गजरात गुलाल उधळून तसेच फटाक्यांची आतषबाजी करुन जल्लोष केला. अमन मित्तल, आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, उपमहापौर भूपाल शेटे, माजी महापौर सरीता मोरे, हसिना फरास, शोभा बोंद्रे यांच्यासह सर्वच नगरसेवकांनी गवंडी यांचे अभिनंदन केले.निवड झाल्यानंतर नूतन महापौर माधवी गवंडी यांनी लागलीच कार्यालय प्रवेश करुन कामकाजाला सुरवात केली. मधुरिमाराजे छत्रपती, वैशाली क्षीरसागर, सायरा हसन मुश्रीफ, नबीला आबीद मुश्रीफ, माजी महापौर सरीता मोरे, हसिना फरास, अश्विनी रामाणे यांच्या उपस्थितीत कार्यालय प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. दुपारी गवंडी समर्थकांनी नूतन महापौरांची महापालिका चौक ते शुक्रवार पेठ या मार्गावरुन सवाद्य मिरवणुक काढली. यावेळी फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळणही केली.निवडणुक सभा उशिरा सुरुमहापालिकेच्या सभा तब्बल तास दिड तास उशिरा सुरु होतात. त्याला महापौरपदाची निवडणुक होणार असलेली विशेष सभा अपवाद असते. परंतु मंगळवारची सभाही चौदा मिनिटे उशिरा सुरु झाली. सकाळी अकरा वाजताची सभा असल्याने पिठासन अधिकारी अमन मित्तल साडेदहा वाजण्यापूर्वीच महापालिकेत पोहचले. परंतु सभागृहात यायला त्यांना ११ वाजून १२ मिनिटे लागली. सर्वच सदस्यही दहा मिनिटे उशिराच सभागृहात पोहचले.

 

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाMayorमहापौरkolhapurकोल्हापूर