शहरं
Join us  
Trending Stories
1
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
2
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
3
“मुंबईच्या गरब्यात सेलिब्रिटींवर लाखोंची उधळण, तेच पैसे शेतऱ्यांना दिले असते”: रोहित पाटील
4
तोंडात कुरकुरे अन् निपचित पडलेला मृतदेह; कोर्टातून फरार झालेल्या आरोपीचा चिमुकलीवर अत्याचार
5
मुंबई-पुण्यात घरांच्या विक्रीत १७% घट; 'या' कारणांमुळे ग्राहकांनी फिरवली पाठ; किमती कमी होणार का?
6
‘आयुष्मान भारत’ योजना बंद पडली? नागपूरच्या रुग्णालयांमध्ये उघडकीस आले धक्कादायक वास्तव; रुग्णांना सेवा नाकारल्या
7
Video - "देवाने हे नियम बनवले नाहीत..."; शॉर्ट्स घालून महिलेने मंदिरात प्रवेश केल्याने मोठा गोंधळ
8
VIDEO: 'पॉवर हिटिंग'! ३ वर्षांच्या चिमुरड्याची बॅटिंग पाहून तुम्हीही म्हणाल- What a Shot!
9
मृत्यूचे कुंड : १०० हून अधिक लोकांना गायब करणारी रहस्यमयी विहीर! ४० मीटर लांब, शास्त्रज्ञांनाही उलगडेना...
10
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
11
कोजागरी शरद पौर्णिमा २०२५: पंचकाची अशुभ छाया अन् अमंगल काळ, शुभ मुहूर्त कधी? लक्ष्मी लाभेल!
12
"मी आभार मानतो, त्यांनी माझे 1000 रुपये वाचवले...!"; फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली, नेमकं काय म्हणाले?
13
Dombivli Crime: मोबाईलचा पासवर्ड बदलला, कुटुंबात राडा! आई, दोन्ही मुले, आजोबामध्ये तुंबळ हाणामारी
14
अमानुष! लेकीशी भांडण... सासरच्यांनी जावयाला विष पाजलं, पळवून पळवून मारलं; झाला मृत्यू
15
२०२७ पर्यंत ५ राशींना साडेसाती, प्रदोषात ‘हे’ करावे; पंचक कायमचे टळेल, शनि शुभ-कल्याण करेल!
16
आंध्र प्रदेशात देवरगट्टू बन्नी उत्सवादरम्यान दोन जणांचा मृत्यू, ९० जण जखमी
17
Video: छातीत झाडल्या तीन गोळ्या, मित्राच्या हत्येचा बनवला व्हिडीओ; पोलिसांची उडाली झोप
18
हव्वा अन् धुव्वा...! महिंद्रा थार फेसलिफ्ट लाँच! हे दोन मुख्य बदल, ग्राहकांची मागणी ऐकली..., दोन नवे रंग...
19
Crime: 'मी तुमच्या मुलीची हत्या केलीये'; मित्रासोबत रुमवर गेली अन् निळ्यामध्ये ड्रममध्ये...; तरुणीची हत्या का केली?
20
Neena Kulkarni: ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी यांना मानाचे विष्णुदास भावे गौरव पदक जाहीर!

दसरा कप ‘दिलबहार’कडे

By admin | Updated: April 2, 2015 01:25 IST

करण चव्हाण-बंदरेची हॅट्ट्रिक : अंतिम सामन्यात ‘फुलेवाडी’चा उडविला ६-१ ने धुव्वा

कोल्हापूर : दिलबहार तालीम मंडळ (अ)ने फुलेवाडी क्रीडा मंडळाचा ६-१ असा धुव्वा उडवीत दसरा कप फुटबॉल स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले. ‘दिलबहार’च्या करण चव्हाण-बंदरेची हॅट्ट्रिक लक्षणीय ठरली.शाहू स्टेडियम येथे दिलबहार (अ) व फुलेवाडी संघ यांच्यात अंतिम सामना झाला. सामन्याच्या प्रारंभापासून दिलबहार (अ)च्या करण चव्हाण-बंदरे, सचिन पाटील, जावेद जमादार, सनी सणगर, गणेश दाते यांनी आक्रमक खेळाचे प्रदर्शन करीत फुलेवाडी संघावर दबाव निर्माण केला. २६व्या मिनिटास फ्री किकवर अनिकेत जाधवने फटका मारला. हा फटका गोलपोस्टला अडून आत आला. ही संधी साधत गणेश दातेने गोल नोंदवीत १-० अशी आघाडी मिळवून दिली. ‘फुलेवाडी’कडून सुशांत अतिग्रे, सूरज शिंगटे, दिग्विजय वाडेकर, मंगेश दिवसे, संकेत वेसणेकर यांनी खोलवर चढाया केल्या. मात्र, ‘दिलबहार’च्या बचावफळीपुढे त्यांचे काहीच चालले नाही. ३२ व्या मिनिटास ‘दिलबहार’च्या सनी सणगरने मैदानी गोल नोंदवीत २-० अशी आघाडी वाढविली. ‘फुलेवाडी’कडून तेजस जाधव, मोहित मंडलिक, संकेत वेसणेकर, अजित पोवार यांनी सामन्यात बरोबरी साधण्याचे आटोकाट प्रयत्न केले. मात्र, त्यांना यश आले नाही. उत्तरार्धात दिलबहार (अ)च्या संघातील खेळाडूंनी आक्रमक व वेगवान चाली रचण्यास सुरुवात केली. तितक्याच वेगाने फुलेवाडी संघानेही प्रतिकार केला. मात्र, अचूक पास व समन्वय यांमुळे ‘दिलबहार’च्या करण चव्हाण-बंदरेने सचिन पाटीलच्या साथीने अनुक्रमे ४६, ६१ आणि ८० व्या मिनिटास सलग तीन गोल नोंदवीत हॅट्ट्रिक साधली. ४८व्या मिनिटास जावेद जमादारच्या पासवर सनी सणगरने मारलेला फटका परतावून लावताना ‘फुलेवाडी’च्या दिग्विजय वाडेकरकडून स्वयंगोल झाला; तर ‘फुलेवाडी’कडून ८३ व्या मिनिटास अजित पोवार याने हेडद्वारे गोल केला. यामुळे सामन्यात आघाडी एक गोलने कमी झाली. सामन्यात फुलेवाडीच्या गोलरक्षकाने ‘डी’बाहेर येत चेंडू हाताळला याबद्दल मुख्य पंचांनी त्याला रेड कार्ड दाखवून बाहेर काढले. अखेर सामना दिलबहार (अ) ने ६-१ असा जिंकत दसरा चषक फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. स्पर्धेतील विजेत्या दिलबहार (अ) संघास ३१ हजार, तर उपविजेत्या फुलेवाडी संघास २१ हजारांचे बक्षीस व दसरा चषक के.एस.ए.चे चीफ पेट्रन छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी वेस्टर्न फुटबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष मालोजीराजे छत्रपती, युवराज संभाजीराजे, के.एस.ए.चे अध्यक्ष दि. के. अतितकर, मानसिंग जाधव, अरुण नरके, माणिक मंडलिक, पोलीस उपनिरीक्षक संभाजी गायकवाड, राजेंद्र दळवी, विजय साळोखे, मनोज जाधव, संभाजी पाटील-मांगोरे, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)स्पर्धेला हुल्लडबाजीने ग्रासलेस्टेडियममध्ये के.एस.ए.ने हुल्लडबाजांना रोखण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. तरीही संपूर्ण दसरा चषक स्पर्धेत टेंबे रोडकडील प्रेक्षक गॅलरीत काही ना काही कारणांनी समर्थकांत हाणामारी झाली. अंतिम सामन्याच्या शेवटच्या काही मिनिटांतही याच गॅलरीतून समर्थकांत जोरदार हाणामारीचा प्रकार झाला. हाणामारीत गंभीर जखमी झालेल्या प्रेक्षकास पोलिसांनी बाहेर नेले; तर एका दहावर्षीय मुलाने या गोंधळात गॅलरीतून थेट स्टेडियममध्ये उडी मारली. सुदैवाने त्याला किरकोळ दुखापत झाली. संपूर्ण स्पर्धा काही खेळाडू आणि समर्थक यांच्या बेशिस्त वर्तनाने गाजली.स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू (सर्व दिलबहार) बेस्ट स्ट्रायकर - सनी सणगर बेस्ट हाफ - करण चव्हाण-बंदरे बेस्ट डिफेन्स - प्रतीक व्हनाळीकर बेस्ट गोलकीपर - शोएब शेख